लव्ह जिहाद : राजू निघाला ओला ड्राइव्हर शाहरुख, २ मुलांचा बाप

102

मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका हिंदू तरुणी लव्ह जिहाद प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये येथे राहणारा शाहरुख असे या  प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो ओला टॅक्सीचा चालक आहे. शाहरुखने  स्वतःचे नाव राजू असल्याचे खोटे सांगत हिंदू मुलीशी मैत्री केली. कालांतराने मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यावर त्याने कोर्ट मॅरेज करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. वास्तवामध्ये राजू नंतर शाहरुख असून तो दोन मुलाचा बाप असल्याचे समजल्यावर हिंदू युवतीच्या पायाखालची जमीन घसरली.

आधार कार्ड पाहिल्यावर खरे नाव समजले 

पीडितेला लग्नाच्या ५ महिन्यांनंतर तिला हे वास्तव समजले. सोमवारी, ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हिंदू युवतीचा जबाब नोंदवण्यात आला. तिने शाहरुखने धमकी दिल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी स्वतंत्र तक्रार नोंदवून रेकॉर्डिंग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, सध्या आरोपी शाहरुख तुरुंगात आहे. २५ वर्षीय हिंदू पीडित तरुणी १० महिन्यांपूर्वी तिच्या मित्रासोबत इंदूरहून उदयपूरला आली होती. इथे तिला आणि तिच्या मैत्रिणीला एका हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगची नोकरी मिळाली. हॉटेलमध्ये जाण्यासाठी दोघांनी उदयपूर रेल्वे स्टेशनवरून ओला टॅक्सी बुक केली. त्यावेळी पीडितेची पहिली भेट कॅब ड्रायव्हर शाहरुख (29 वर्षे) सोबत झाली. त्याने संभाषणात आपले नाव राजू उर्फ राजकुमार सांगितले. यानंतर तिची ओळख झाली आणि ती त्याला रोज फोन करून तिला एका खोलीतून हॉटेलमध्ये आणण्यासाठी आणि सोडायला सांगायची. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यात काही दिवसांपासून सामान्य मैत्री होती. त्यानंतर सुमारे ७ महिन्यांपूर्वी शाहरुखने तिला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, मुलगीही त्याच्या प्रेमात पडली आणि तिने लग्नाला होकार दिला. यानंतर, सुमारे ५ महिन्यांपूर्वी दोघांनी लग्न केले आणि एकत्र राहू लागले. शाहरुख रात्री तिच्यासोबत राहायचा. एक दिवस शाहरुखला त्याच्या मोबाईलवर पहिल्या पत्नीचा फोन आला. तिने सांगितले की, आपण शाहरुखची पत्नी आहे. यानंतर मुलीने त्याच्याकडे चौकशी केली असता कळले की, शाहरुख हा तिचा नवरा असून अनेक वर्षांपासून हा नंबर वापरत आहे. यानंतर तरुणीने राजू उर्फ शाहरुखचे आधार कार्ड तपासले, तेव्हा वास्तव तिच्या समोर आले.

(हेही वाचा तेलंगणाचा ‘वाघ’ बाहेर, आमदार टी. राजा यांना जामीन मंजूर)

मुस्लिम धर्मात ४ निकाह करण्याची परवानगी – आरोपी शाहरुख 

दिवाळीच्या वेळी मला कळले की, त्याचे खरे नाव राजू नसून शाहरुख आहे आणि तो आधीच विवाहित आहे. त्याला २ मुलगे आहेत. एक 7 वर्षांचा आणि दुसरा 4 वर्षांचा आहे. जेव्हा मी त्याला त्याचा धर्म, लग्न आणि मुलांची माहिती लपवण्याबद्दल विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की, आमच्या धर्मात चार निकाह (विवाह) करण्यासाठी परवानगी आहे. तुही मुस्लिम धर्म स्वीकार आणि माझ्यासोबत माझ्या घरात रहा आणि तू ऐकले नाहीस तर तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. यानंतर पीडित मुलगी उदयपूरहून इंदूरला आली, पण इथेही शाहरुखने तिचा पाठलाग सोडला नाही. शाहरुखने तिला फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली, त्यानंतर मुलीने कुटुंबातील सदस्य, माजी सरपंच, जिल्हा सदस्य आणि हिंदू जागरण मंचच्या लोकांकडे मदत मागितली आणि त्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरून पीडितेने शाहरुखला तिच्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी इंदूरला बोलावले. तो येथे येताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला २ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक केली. त्याच्याविरुद्ध वारंवार बलात्कार, ओलीस ठेवणे आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.