बापरे! थंडी आणि धुक्यामुळे ‘या’ ४८१ रेल्वे गाड्या रद्द

80

देशभरात विविध भागात थंडी वाढली आहे. कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. त्यामुळे रेल्वेच्या 481 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या “नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम”वर (एनटीईएस) संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. कडाक्याच्या थंडीबरोबरच अनेक ठिकाणी ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमच्या अधिकृत वेबसाइटवर रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे.

रद्द झालेल्या गाड्या

  • 22406 आनंद विहार – भागलपूर गरीब रथ (24 जानेवारी रोजी रद्द)
  • 22405 भागलपूर-आनंद विहार गरीब रथ (23 जानेवारी रोजी रद्द)
  • 13499 भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस (23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द)
  • डाऊनमध्ये भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस 23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द
  • 13236 दानापूर-साहिबगंज
  • 13235 साहिबगंज-दानापूर इंटरसिटी एक्सप्रेस (24 ते 28 जानेवारीपर्यंत रद्द)
  • 15553 जयनगर- भागलपूर (24 ते 28 जानेवारीपर्यंत रद्द)
  • 15554 भागलपूर-जयनगर एक्सप्रेस (23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द)
  • 13242 राजेंद्रनगर- बांका (24 ते 26 जानेवारीपर्यंत रद्द )
  • 13241 बांका-राजेंद्रनगर इंटरसिटी (25ते 27 जानेवारी पर्यंत रद्द).

( हेही वाचा: इंडिया गेटवर सुभाषचंद्रांच्या होलोग्राम प्रतिमेचं अनावरण, काय म्हणाले पंतप्रधान मोदी…)

रेल्वे अधिका-यांनी दिली माहिती 

साहिबगंज-जमालपूर, भागलपूर-जमालपूर, जमालपूर-क्यूल दरम्यान धावणाऱ्या 9 पॅसेंजर ट्रेन्स 22 ते 28 जानेवारी दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच रेल्वेच्या 481 गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. 13409/13410 मालदा-क्यूल या 28 जानेवारीपर्यंत भागलपूर स्टेशनपर्यंतच धावतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.