Railway Administration: कल्याण-डोंबिवली स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा निर्णय, नेमकी काय उपाययोजना? वाचा सविस्तर…

रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला, कल्याण, डोंबिवली, वडाळा यासारख्या काही स्थानाकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हटवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

189
Railway Administration: कल्याण-डोंबिवली स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा निर्णय, नेमकी काय उपाययोजना? वाचा सविस्तर...
Railway Administration: कल्याण-डोंबिवली स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा नवा निर्णय, नेमकी काय उपाययोजना? वाचा सविस्तर...

नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वसई, विरार आणि कल्याण-डोंबिवली येथून मुंबईत अनेक चाकरमानी, विद्यार्थी नोकरीनिमित्त, शिक्षण तसेच इतरही कामानिमित्त दररोज मुंबईपर्यंत प्रवास करतात. कोणत्याही वेळी लोकलला येथून येणाऱ्यांची गर्दी जास्त असते. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी करत असते. (Railway Administration)

यामध्ये गाड्यांची संख्या वाढवणे, फेऱ्या वाढवणे, डब्यांची संख्या वाढवणे…अशा विविध उपाययोजना आतापर्यंत रेल्वेकडून करण्यात आलेल्या आहेत, मात्र तरीही रेल्वेची प्रवसी संख्या कोणत्याही वेळेत कमी झालेली नाही. उलट दिवसेंदिवस गर्दीत वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिकाधिक आरामदायी आणि गर्दीविना होण्यासाठी रेल्वेने आणखी एक नवीन निर्णय घेतला असून यासंदर्भातील कामालाही सुरुवात झाली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 :…Vijay Shivtare यांच्यावर केव्हा होणार कारवाई; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले )

काय केली उपाययोजना ?
– रेल्वे फलाट गर्दीमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वेने कुर्ला, कल्याण, डोंबिवली, वडाळा यासारख्या काही स्थानाकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हटवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
– रेल्वेच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आता हटवण्यात येणार आहेत.
– यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे फलाट गर्दी मुक्त करण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, गाडी फलाटावर आल्यानंतर सीट मिळवण्यासाठी नागरिक लोकलमध्ये चढण्यासाठी घाई करतात. अशावेळी बऱ्याचदा चेंगराचेंगरीच्या घटना घडतात किंवा लांब पल्ल्यांच्या गाड्या आल्यानंतर गर्दी जास्तच वाढते. त्यावर रेल्वेने हा तोडगा काढला आहे.

गर्दीचे सर्वेक्षण…
रेल्वे फलाटावरील गर्दी कशी कमी करता येईल,याचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही स्थानकांत पाहणी केली होती. त्यावेळी रेल्वे फलाटांवरील स्टॉलमुळे गर्दीचे प्रमाण वाढते असे लक्षात आले. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे तसेच नागरिकांना रेल्वे स्थानकाबाहेरील दुकानात सहज खाद्यपदार्थ उपलब्ध होतात. त्यामुळेच गर्दीच्या दृष्टीने रेल्वे स्थानकातील खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू आहेत. सध्या कुर्ला, कल्याण, डोंबिवली आणि वडाळा रोड या गर्दीच्या स्थानकातील खाद्यपदार्थ स्टॉल हटवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी दादर, ठाणे आणि घाटकोपर स्थानकांतील फलाटांवरील स्टॉल हटवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने कामदेखील सुरू करण्यात आले आहे. या स्टॉलधारकांना स्थानकातच पर्यायी जागा देण्याचा विचार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.