Muslim : मीरा रोडमध्ये पुन्हा धार्मिक हिंसाचार; अल्पवयीन हिंदू तरुणाने ‘जय श्रीराम’ म्हटल्याने धर्मांध मुसलमानांकडून मारहाण; ‘अल्लाहू अकबर’ म्हणायला भाग पाडले

703
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडमध्ये पुन्हा एकदा धार्मिक कट्टरतेच प्रकरण समोर आले आहे. एक हिंदू अल्पवयीन मुलगा जय श्री राम म्हणाला म्हणून मुसलमान तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली. पीडित मुलाला ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा द्यायला देखील भाग पाडण्यात आले.
पीडित मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला. आरोपी  (Muslim)पीडित मुलाचा पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. 25 मार्च रात्री 9 वाजताची ही धक्कादायक घटना आहे. या प्रकारानंतर पीडित मुलगा खूप घाबरला. तो दूध घेण्यासाठी बाहेर आला होता, त्यावेळी ही घटना घडली. मीरा रोड भागात या पूर्वी सुद्धा जातीय वाद झाला आहे. राम मंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी 21 जानेवारीला मीरा रोड येथील नया नगर येथून हिंदूंची शोभायात्रा जात असताना अचानक दबा धरून बसलेल्या मुसलमानांनी (Muslim)  या यात्रेवर हल्ला केला. परिसरातील धार्मिक तणाव लक्षात घेऊन पोलीस प्रशासन पूर्णपणे अलर्ट जारी केला होता.

लिफ्टजवळ पकडून मारहाण 

सोमवारी रात्री अल्पवयीन हिंदू मुलगा दूध घेऊन सोसायटीच्या दिशेने येत होता. सोसायटी जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला तो जय श्री राम बोलला. त्या व्यक्तीच्या बाजूला असलेल्या अन्य पाच मुसलमानांनी (Muslim) त्याला थांबायला सांगितले. पीडित मुलगा त्यांना बघून घाबरला. तो सोसायटीच्या आत पळाला. आरोपी सुद्धा त्याच्या मागे पळाले. आरोपींनी पीडित मुलाला लिफ्ट जवळ पकडले व त्याला मारहाण केली. मुलाने कोणाला पाहून जय श्री राम म्हटलं? पीडित मुलाचा आरोप आहे की, त्याला माराहण केल्यानंतर आरोपी युवकांनी त्याला अल्लाहू अकबरच्या घोषणा द्यायला लावल्या. पीडित मुलाने भितीपोटी घोषणा दिल्या. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने या घटनेची मुलाच्या वडिलांना माहिती दिली. पीडित मुलाचे वडिल तिथे येताच आरोपी पळून गेले. पीडित मुलाने सांगितलं की, “तो जेव्हा सोसायटीच्या दिशेने आला, त्यावेळी त्याला वाटलं की, वॉचमन उभा आहे. म्हणून त्याने त्या व्यक्तीला जय श्री राम म्हटलं”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.