Rahul Shewale : राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका; खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा

सोमवारी, १८ मार्च रोजी धारावीतील कमला रामन नगर येथून धारावी पुनर्विकासासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात झाली.

131
Rahul Shewale : राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका; खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा
Rahul Shewale : राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका; खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा
विशेष प्रतिनिधी, मुंबई

“केवळ राजकारण करण्यासाठी खोटी माहिती पसरवून धारावी पुनर्विकास प्रकल्पाची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा धारावीतील जनता आणि भावी पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत”, असा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी विरोधकांना दिला आहे. धारावीत सुरू झालेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल विरोधकांकडून केली जात आहे. यावर खासदार शेवाळे (Rahul Shewale) यांनी ही प्रतिक्रिया दिली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनाला धक्का, मे महिन्याच्या सुट्टीतील सहलीचे बेत रद्द)

सोमवारी, १८ मार्च रोजी धारावीतील कमला रामन नगर येथून धारावी पुनर्विकासासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात झाली. या सर्वेक्षणात धारावीतील प्रत्येक बांधकामाची नोंद बारकोडच्या माध्यमातून करण्यात येत आहे. “पहिल्याच दिवशी या सर्वेक्षणाला धारवीकरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने विरोधकांचे अवसान गळाले आहे. म्हणून त्यांनी विनाकारण बिनबुडाचे आरोप करत जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरविण्यास सुरुवात केली आहे. माटुंगा रोड रेल्वे स्थानकासमोरील कमला रामन नगर या झोपडपट्टीचा परिसर हा धारावी नोटिफाईड एरियाचाच भाग असून यापूर्वीही येथे एसआरएने सर्वेक्षण केले होते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नसून पुनर्विकास प्रकल्पाला खोडा घालण्याचा हा प्रयत्न त्यांनी थांबवावा” असे खासदार शेवाळे (Rahul Shewale) यांनी स्पष्ट केले.

तसेच, धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला असल्याने येथील प्रत्येकाला घर मिळणार असून पात्र आणि अपात्र बांधकामांबाबत राज्य सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणून जनतेने खोट्या प्रचाराला बळी न पडता या सर्वेक्षणाला सहकार्य करावे, असेही आवाहन शेवाळे (Rahul Shewale) यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.