Jharkhand : आता झारखंडमध्ये सोरेन कुटुंबात फूट; थोरल्या सुनेने थेट भाजपाचा झेंडा घेतला हाती

सोरेन कुटुंबात आपली उपेक्षा होते आहे. आपले काहीही म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे वैतागून आपण झारखंड मुक्ती मोर्चा नावाचा पक्ष सोडत आहोत, असे सीता सोरेन यांनी शिबू सोरेन यांना पत्र लिहून जाहीर केले.

144

महाराष्ट्रात पवार कुटुंबात उभी फूट पडल्यानंतर आता झारखंडमध्ये (Jharkhand) सोरेन कुटुंबात फूट पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमध्ये कोळसा खाण घोटाळ्याच्या आरोपाखाली झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले. आता सोरेन कुटुंबात फूट पडली आहे. हेमंत सोरेन यांच्या भावाची पत्नी  आणि शिबू सोरेन यांची थोरली सून आमदार सीता सोरेन यांनी कुटुंबातच बंड केले आहे. आपल्यावर कुटुंबात अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी झारखंड (Jharkhand) मुक्ती मोर्चातल्या सर्व पदांचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनाला धक्का, मे महिन्याच्या सुट्टीतील सहलीचे बेत रद्द)

दोन जावांमध्ये सत्तासंघर्ष 

सोरेन कुटुंबात आपली उपेक्षा होते आहे. आपले काहीही म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे वैतागून आपण झारखंड (Jharkhand) मुक्ती मोर्चा नावाचा पक्ष सोडत आहोत, असे त्यांनी शिबू सोरेन यांना पत्र लिहून जाहीर केले. हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी परवाच मुंबईत इंडि आघाडीच्या सभेत येऊन भाषण केले होते. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री केले. त्यांच्या मंत्रिमंडळात सीता सोरेन यांना स्थान दिले नाही. त्यामुळे त्या आधीच पक्षावर चिडल्या होत्या. काल परवा चंपई सोरेन आणि कल्पना सोरेन यांनी मुंबईत महाविकास मुंबईत इंडि आघाडीच्या सभेत येऊन भाषण केले. त्यामुळे सीता सोरेन यांच्या जखमेवर अधिकच मीठ चोळले गेले. म्हणून त्यांनी झारखंड (Jharkhand) मुक्ती मोर्चा सरचिटणीस पद तसेच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सीता सोरेन यांचे पती दुर्गा सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिवस्वरेन यांचे थोरले चिरंजीव होते. त्यांच्या वयाच्या 40 व्या वर्षीच ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला. ते देखील झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार होते. त्यांच्या मागे सीता सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चाने तिकीट देऊन आमदार केले, पण सीता सोरेन आणि कल्पना सोरेन या दोन जावांमध्ये सत्ता संघर्ष झाला. त्यामुळे सीता सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चातून बाहेर पडावे लागले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.