Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनाला धक्का, मे महिन्याच्या सुट्टीतील सहलीचे बेत रद्द

पर्यटन कंपन्यांनी मे महिन्यातील पर्यटनाविषयी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पर्यटन कंपन्यांकडील पर्यटनाबाबतच्या चौकशीचे प्रमाण फक्त २५ ते ३० टक्के कमी झाले आहे.

100
TLok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनाला धक्का, मे महिन्याच्या सुट्टीतील सहलीचे बेत रद्द
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनाला धक्का, मे महिन्याच्या सुट्टीतील सहलीचे बेत रद्द

कोरोना काळात पर्यटन व्यवसाय ठप्प पडला होता. त्यानंतर हळूहळू हा व्यवसाय जोर धरू लागला, मात्र आता लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election 2024) पर्यटनाला फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. अनेक शासकीय कर्मचारी, शिक्षण तसेच इतर क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरदार यांनी मे महिन्यातील सहलीचे बेत रद्द केले आहेत, अशी माहिती टुरिझम कंपन्या आणि ट्रॅव्हल एजंट यांनी दिली आहे.

पर्यटकांकडून मतदानाला प्राधान्य
पर्यटन कंपन्यांनी मे महिन्यातील पर्यटनाविषयी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पर्यटन कंपन्यांकडील पर्यटनाबाबतच्या चौकशीचे प्रमाण फक्त २५ ते ३० टक्के कमी झाले आहे. त्यामुळेच निवडणुकीचे प्रदीर्घ वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बाजवण्याबद्दलही सरकारकडून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मतदानाला प्राधान्य दिले जात आहे. पर्यटन हंगामावर याचा परिणाम होण्याची भीती पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: राज्यातील राजकारणाला वेग, राज ठाकरे दिल्लीत तर अजित पवार फडणवीसांच्या बंगल्यावर)

पर्यटनाचे नियोजन बारगळले
हिमाचल प्रदेश ट्रॅव्हल एजंट असोसिएशनने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. त्यात हिमाचल प्रदेशात मे, एप्रिल आणि जून महिन्यात पर्यटन हंगाम असतो. या काळातच निवडणूक आहे. त्यात हिमाचल प्रदेशात पहिल्या टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. उन्हाळ्यात शाळेला सुट्या असल्याने पालकही पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात. यंदा मात्र, निवडणुकीमुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांसह इतरांचेही पर्यटनाचे नियोजन बारगळले आहे; कारण निवडणूक काळात शासकीय सुट्टी मिळणे अवघड असते.

६० टक्केच व्यवसाय होण्याची शक्यता
जम्मू कश्मीर, लेह-लद्दाख, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, उत्तराचंल, हिमाचल प्रदेश, दार्जिलिंग, डलहौसी, मसुरी या ठिकाणांसह आता नवीन राज्यांकडे पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. त्यात अरुणाचल प्रदेश, नागालॅंड आदी राज्ये आहेत. दरवर्षी मार्च महिन्यात बुकिंगचे प्रमाण कमीच असते. एप्रिलनंतर पर्यटनाची तयारी होत असल्याने विविध स्थळांबद्दल विचारणा होते, परंतु यंदा निवडणुकीमुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसणार आहे. ६० टक्केच व्यवसाय होण्याची शक्यता आहे, असे मत टुरिझम इंटरप्रिन्युअर्स नेटवर्कचे अध्यक्ष विश्वनाथ उपाध्याय यांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.