Punjab Drugs : पंजाबमध्ये नशा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; ड्रग्जमुळे १९ महिन्यात तब्बल २७२ मृत्यू

एनसीआरबीकडून आकडेवारी जाहीर

81
Punjab Drugs : पंजाबमध्ये नशा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; ड्रग्जमुळे १९ महिन्यात तब्बल २७२ मृत्यू

पंजाबमधून (Punjab Drugs) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये गेल्या १९ महिन्यात अंमलीपदार्थांमुळे २७२ जणांचा मृत्यू झाला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती सामोर आली आहे.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, पंजाबमध्ये २०१७ ते २०२१ या ४ वर्षांत ड्रग्जमुळे (Punjab Drugs) २७२ लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा आता १९ महिन्यांत म्हणजेच केवळ दीड वर्षांत २७२ तरुणांना ड्रग्जमुळे जीव गमवावा लागला आहे. मृत्यूची ही आकडेवारी रुग्णालयांनी उपलब्ध करुन दिली आहे, तर ज्या लोकांचा घरी मृत्यू झाला असेल किंवा काही कारणास्तव रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत अशा लोकांबद्दल कोणतीही माहिती नाही.

(हेही वाचा – Ind Vs WI T20I : भारतीय क्रिकेटपटू वेस्ट इंडिजमध्ये ‘या’ गोष्टीची करतायत तक्रार)

अंमली पदार्थांच्या (Punjab Drugs) व्यसनाने राज्यातील तरुणांना अशाप्रकारे गुरफटले आहे की, वर्तमानातही राज्यातील २५ लाखांहून अधिक माणसं त्याच्या विळख्यात अडकली आहेत. यासंदर्भातील अहवालानुसार पंजाबच्या मोगा, फिरोजपूर, लुधियाना आणि भटिंडा या ४ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. राज्यातील या ४ जिल्ह्यांमध्ये २०२२ आणि २०२३ दरम्यान २३५ जणांना नशेमुळे जीव गमवावा लागला आहे.

राज्यात २०२२ मध्ये मोगा येथे ३७ फिरोजपूरमध्ये ३५ आणि भटिंडा येथे २२ लोकांनी (Punjab Drugs) आपला जीव गमावला आहे. तर २०२३ मध्ये अनुक्रमे १०, २१, १० लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, इतर सर्व जिल्ह्यांमध्ये मृतांचा आकडा हा १० पेक्षा जास्त नाही. म्हणजे उपरोक्त ५ जिल्ह्यांच्या तुलनेत येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

एनसीआरबीच्या (Punjab Drugs) आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या ७ वर्षांमध्ये अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एकूण ५४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे सध्या पंजाबचा माळवा प्रदेश ड्रग्जचा अड्डा बनत चालला आहे. गेल्या १९ महिन्यांतील एकूण मृत्यूंपैकी २२२ एकट्या या भागातील आहेत. अहवालानुसार, पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये १८ ते ३० वयोगटातील (Punjab Drugs) तरुणांचा समावेश आहे. राज्यात २०१७ ते २०२१ या कालावधीत नशेमुळे झालेल्या २७२ मृत्यूंपैकी १२२ जणांचे वय हे १८ ते ३० वर्षे दरम्यान होते. तसेच ५९ लोक ज्यांचे वय ३० ते ४० वर्षे होते, तर ८ लोक ४५ ते ६० वयोगटातील होते. तर ६० वर्षांवरील देखील काहींचा यामध्ये समावेश होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.