Pune: पुणे ते लोणावळा १० डिसेंबरला मेगाब्लॉक, कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द; जाणून घ्या…

मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे.

167
Pune: पुणे ते लोणावळा १० डिसेंबरला मेगाब्लॉक, कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द; जाणून घ्या...
Pune: पुणे ते लोणावळा १० डिसेंबरला मेगाब्लॉक, कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द; जाणून घ्या...

पुणे (Pune) ते लोणावळा उपनगरीय सेक्शनवर इंजिनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरिता रविवारी, १० डिसेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द…

– पुण्याहून लोणावळ्यासाठी ०९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द राहील.
– पुण्याहून लोणावळ्यासाठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द राहिल.
-पुण्याहून लोणावळ्यासाठी १५.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द राहील.
– शिवाजीनगरहून तळेगावकरिता १५.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द राहील.
-पुण्याहून लोणावळ्याकरिता १६.२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द राहील.
-शिवाजीनगरवरून लोणावळाकरिता १७.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० रद्द राहील.
-पुण्याहून लोणावळ्यासाठी १८.०२ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७२ रद्द राहील.

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द करणे…
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०.०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुणे साठी १४.५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक०१५६१ रद्द राहील.
– तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १७.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी १८.०८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द राहील.
– लोणावळ्याहून पुण्यासाठी १९.०० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द राहील.
– लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १९.३५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७१ रद्द राहील.

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन
– गाडी क्रमांक १२१६४ एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ०३.३० तास रेग्युलेट करण्यात येईल.
–  मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करण्याची विनंती प्रवाशांना करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.