PUNE: पुण्याची चारही धरणे १०० टक्के भरली, तरीही गुरुवारी ‘या’ भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

97
PUNE: पुण्याची चारही धरणे १०० टक्के भरली, तरीही गुरुवारी 'या' भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन
PUNE: पुण्याची चारही धरणे १०० टक्के भरली, तरीही गुरुवारी 'या' भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

PUNE: पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे १०० टक्के भरली. त्यामुळे पुणेकरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने संततधार पाऊस सुरू असल्याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा – Mark Zuckerberg झुकले! मुलांचे लैंगिक शोषण आणि डीपफेक प्रकरणी मागितली जाहीर माफी

हवामान विभागाचा इशारा
कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे आज रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांसाठी जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. तसेच पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने त्या भागांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा…
एसएनडीटी परिसर, कर्वे रस्ता, एरंडवणे, वारजे, औंध, खडकी, बोपोडी, विद्यापीठ परिसर तसेच आसपासचे भाग प्रभावित होणार आहेत. महापालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले असून, गुरुवारी सकाळी या भागांमध्ये पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.