Pro Govinda Competition : गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

94
Pro Govinda Competition : गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहीहंडी गोविंदा (Pro Govinda Competition) या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

वरळी येथील एनएससीआय येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग २०२३ (Pro Govinda Competition) या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, आणि दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.

(हेही वाचा – Sudhir More Suicide : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या)

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने ५० हजार गोविंदांना (Pro Govinda Competition) विमा कवच दिले होते. ५० हजार नोंदणी पूर्ण झाली आणि अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी २५ हजार गोविंदांना विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली. त्यामुळे आता एकूण ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे. दहीहंडी उत्सव स्व.आनंद दिघे यांनी ठाणे शहरात प्रथम मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. थरांचे विक्रमही ठाण्यातील गोविंदांनी केले. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आली आहे.

राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत. राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डी सारखे प्रो गोविंदासाठी (Pro Govinda Competition) अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा गोविंदाचा विमा (Pro Govinda Competition) उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गोविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनाही सहकार्य करण्यात आले आहे. यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर भरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रो गोविंदा या स्पर्धेची (Pro Govinda Competition) थीम ‘घेवून टाक’ अशी आहे. तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. पहिले बक्षीस ११ लाख रुपये, दुसरे बक्षीस ७ लाख रुपये, तिसरे बक्षीस ५ लाख रुपये आणि चौथे बक्षीस ३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.