दसऱ्यानिमित्त दादर फुल मार्केटमध्ये मुंबईकरांची गर्दी

104

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर यंदा मोठ्या उत्साहात सण साजरे केले जात आहेत. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा (विजयादशमी) सणाला देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर दसरा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी दादरच्या फूल मार्केटमध्ये तुफान गर्दी झाली होती. या निमित्ताने झेंडूची फुले, आपट्याची (शमी) पाने, तोरण खरेदी करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे दिसून आले.

विजयादशमीचा सण झेंडूच्या फुलांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यात अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले. परिणामी दसऱ्यानिमित्त झेंडूचा भाव आणखी वधारलेला दिसत आहे. सध्या दादर मार्केटमध्ये झेंडू १०० रुपये प्रती किलोने विकला जात आहे. तर उपनगरात काही ठिकाणी हा भाव १५० रुपये प्रति किलोवर गेला आहे. तर शेवंती १६० रुपये, रजनीगंधा ३०० रुपये, लिली ४०० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तोरणाचे भावही ७० ते १०० रुपयांदरम्यान आहेत. एकूणच महाग असली तरी फुले आणि तोरण खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी बघायला मिळत आहे.

( हेही वाचा: Patra Chawl Case: राऊतांचा दसरा मेळावा कोठडीतच; 10 ऑक्टोबरपर्यंत ED कोठडीत वाढ )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.