Cinedom : मध्य रेल्वे वरील चार स्थानकावर प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम उभारणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे.

77
Cinedom : मध्य रेल्वे वरील चार स्थानकावर प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम उभारणार
Cinedom : मध्य रेल्वे वरील चार स्थानकावर प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम उभारणार

मध्य रेल्वे वरील अनेक स्थानक आता पंचतारांकित हॉटेल प्रमाणे सोयीसुविधा देण्यात येणार आहे. त्यामध्येच आता प्रवाशांना ट्रेन ची वाट पाहत असताना आता प्रवाशांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. स्थानकावरच ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ (Cinedom) उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रवाशांना चित्रपट,लघुपट अनेक माहितीपूर्ण चित्रफित लावण्यात येणार आहेत. म्हणजे प्रवाशांना एकाच ठिकाणी अनेक सुविधांचा एकाच वेळी लाभ घेता येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मध्य रेल्वे वरील चार स्थानकांचा समावेश असणार आहे.

मध्य रेल्वेवरील डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी या रेल्वे स्थानकांमध्ये ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ उभारण्यात येणार आहे. या स्थानकांमधील तब्बल पाच हजार चौरस फूट जागेत ‘सिनेडोम’ची निर्मिती करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे स्थानकामध्ये प्रवासीभिमुख सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

(हेही वाचा : Gauri – Ganapati : यंदा पाच दिवसांसह मुंबईत गौरी गणपतीत दोन हजारने वाढ )

१० वर्षाचा कालावधी
प्री- फॅब्रिकेटेड सिने डोम ही तात्पुरती व्यवस्था असून त्याला कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कंत्राटदार स्वत:च सिने डोमचे व्यवस्थापन आणि ऑपरेटर करतील. १० वर्षांच्या कालावधीसाठी  स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू उत्पन्न मॉडेल अंतर्गत असणार आहे. या स्थानकात ५ हजार चौरस फूट जागेत डोमची निर्मिती होणार आहे.

रेल्वे च्या तिजोरीत भर
दरम्यान, ज्या संस्थांकडे या सिने डोमची जबाबदारी दिली जाईल, त्यांच्याकडून मध्य रेल्वे शुल्कापोटी लाखो रुपये वसूल करणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत आयतीच मिळकत होणार आहे. सिने डोमच्या माध्यमातून रेल्वेला महसूलाचा एक मार्ग मिळाला असून त्याला प्रवासी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.