USA Vs China : चीन युद्धाच्या तयारीत; अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांची चेतावणी

68
USA Vs China : चीन युद्धाच्या तयारीत; अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांची चेतावणी
USA Vs China : चीन युद्धाच्या तयारीत; अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांची चेतावणी

चीनच्या नेत्यांना एवढा विश्वास आहे की, ते स्पाय बलून आपल्या हवाई क्षेत्रात पाठवत आहेत. (USA Vs China) याशिवाय ते क्युबाजवळ हेरगिरीसाठी तळही तयार करत आहेत. कम्युनिस्ट पक्ष युद्धाच्या तयारीत आहे आणि चीनच्या नेत्यांचा विजयाचा इरादा आहे. चीन युद्धाच्या तयारीत आहे. तो गेल्या 50 वर्षांपासून अमेरिकेला पराभूत करण्याचा कट रचत आहे आणि अनेक प्रकारे चीनच्या सैन्याची क्षमता अमेरिकन सैन्याच्या बरोबरीची आहे, अशी चेतावणी अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेल्या निक्की हेली यांनी दिली आहे. २२ सप्टेंबर या दिवशी न्यू हॅम्पशायरमध्ये अर्थव्यवस्थेवर भाषण देताना हेली यांनी हे वक्तव्य केले.

(हेही वाचा – Gauri – Ganapati : यंदा पाच दिवसांसह मुंबईत गौरी गणपतीत दोन हजारने वाढ )

या वेळी निक्की हेली यांनी जर त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या, तर अमेरिकेतील लोकांच्या जीवनात काय बदल घडवून आणतील, हेही सांगितले. (USA Vs China) करात कपात करणे, नोकरशहांच्या कार्यकाळावर मर्यादा घालणे आणि अनावश्यक कायदे हटवण्याविषयी त्या बोलल्या.

चीन हा जगासाठी अस्तित्वाचा धोका

निक्की हेली पुढे म्हणाल्या, ”चीन हा अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी अस्तित्वाचा धोका आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, त्यांना एक मोठे आणि प्रगत सैन्य तयार करायचे आहे, जे अमेरिकेला घाबरवण्यास सक्षम असेल. याद्वारे त्यांना आशिया आणि त्यापलीकडे प्रभाव वाढवायचा आहे. चीनचे सैन्य काही बाबतीत आपल्या बरोबरीचे आहे, तर काही बाबतीत ते आपल्यापेक्षाही पुढे आहे. त्यांनी अमेरिकेची व्यापार गुपिते घेऊन महत्त्वाचे उद्योग ताब्यात घेतले आहेत. या उद्योगांमध्ये औषध ते प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामुळे चीन विक्रमी वेळेत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशातून जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. चीनने उत्पादन क्षेत्रात अमेरिकेकडून नोकऱ्या हिसकावून घेतल्या आहेत.” (USA Vs China)

यापूर्वी भारतीय वंशाचे दुसरे उमेदवार विवेक रामास्वामी चीनपासून आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याविषयी बोलले होते. ते म्हणाले होते, ”मला भारतासह इतर देशांशी संबंध आणखी सुधारायचे आहेत, जेणेकरून चीनवरील आपले अवलंबित्व कमी करता येईल.” (USA Vs China)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.