
-
प्रतिनिधी
Pratap Sarnaik येत्या १ मेपासून राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना केवळ स्टेअरिंगवर नियंत्रण असून चालणार नाही, तर त्यांना मराठी भाषेचेही उत्तम ज्ञान असणे बंधनकारक होणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परिवहन विभागाने हा मोठा निर्णय घेतला असून, मराठी लिहिता किंवा वाचता न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट रद्द करण्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. (Pratap Sarnaik)
मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार, परवाना मिळवण्यासाठी स्थानिक भाषेचे ज्ञान असणे ही अट जुनीच आहे. मात्र, गेल्या काही काळापासून मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधत नाहीत किंवा तसा प्रयत्नही करत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने आता ही नियमावली कडक करण्याचा पवित्रा घेतला आहे. (Pratap Sarnaik)
(हेही वाचा – PUNE शहरात मंगळवारी जड आणि अवजड वाहनांना बंदी, नागरिकांना ‘या’ पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन)
१ मेपासून राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत (RTO) विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेत चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची पडताळणी केली जाणार आहे. “ज्या राज्यात आपण राहतो आणि व्यवसाय करतो, त्या राज्याच्या भाषेचा आदर करणे आणि ती शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. (Pratap Sarnaik)
केवळ चालकांवरच नाही, तर नियमांकडे डोळेझाक करून अपात्र व्यक्तींना परवाने देणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे आता परप्रांतीय किंवा मराठी न येणाऱ्या चालकांना रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी मराठी भाषेचे धडे गिरवणे अनिवार्य झाले आहे. (Pratap Sarnaik)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
