Mangal Prabhat Lodha : आता गावागावात कुशल मनुष्यबळ तयार होणार

गावागावात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' ही संकल्पना हाती घेतल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली.

106
Mangal Prabhat Lodha : आता गावागावात कुशल मनुष्यबळ तयार होणार
Mangal Prabhat Lodha : आता गावागावात कुशल मनुष्यबळ तयार होणार

जगभरात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना, सर्वच क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची निकड भासू लागली आहे. ही निकड पूर्ण करण्याची सर्वाधिक क्षमता भारताकडे आहे; कारण आपला देश युवकांचा आहे. ही बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासाला विशेष म्हत्त्व दिले आहे. भारत हा जगाला कुशल मनुष्यबळ पुरवणारा देश व्हावा, असे त्यांचे स्वप्न आहे. पंतप्रधानांचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला असून, गावागावात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना हाती घेतल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी दिली. (Mangal Prabhat Lodha)

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये याआधी एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. आमच्या सरकारने ५०० ग्रामपंचातींमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला असून, येत्या १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे’, असेही लोढा यांनी सांगितले. (Mangal Prabhat Lodha)

(हेही वाचा – Pimpri-Bhimashankar Mandir : पिंपरीतील भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी, ३६ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल)

ग्रामीण विकासाला चालना मिळणार
  • ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ठरणार आहे. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, त्या दृष्टीने कौशल्य विकास केंद्रांची संकल्पना महत्वाची असून, भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढविण्यात येईल. (Mangal Prabhat Lodha)
  •  हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह महिला व बालविकास विभागांचा यामध्ये सहभाग असणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्या-ज्या गावांत हे केंद्र सुरु होणार आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांचा कार्यक्रमात सहभाग वाढावा यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. (Mangal Prabhat Lodha)
  • लोकप्रतिनिधींसह आशा व अंगणवाडी सेविका या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभाग नोंदवतील. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अन्य घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले. (Mangal Prabhat Lodha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.