Pimpri-Bhimashankar Mandir : पिंपरीतील भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी, ३६ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुजाऱ्यांमधील वादाचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल

25
Pimpri-Bhimashankar Mandir : पिंपरीतील भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी, ३६ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल
Pimpri-Bhimashankar Mandir : पिंपरीतील भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी, ३६ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल

पिंपरीच्या भीमाशंकर मंदिरात (Pimpri-Bhimashankar Mandir) धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी -भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारीची ( Fighting between two groups) घटना घडली आहे. पुजाऱ्यांच्या दोन गटात झालेल्या या हाणामारीत लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला.

मंदिरातील पूजेदरम्यान मानअपमानामुळे ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोन गटात पूजा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. मंदिरात उपस्थित असलेल्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.  पुजाऱ्यांमध्ये झालेल्या या वादाचा व्हिडियोदेखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३६ पुजाऱ्यांवर (36 priests) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

(हेही वाचा – Same Sex Marriage : समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार नाहीच  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.