Powai Lake : पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी सव्वा अकरा कोटींची सफाई

नालेसफाईच्या कामांपेक्षा जलपर्णी काढण्यावर अधिक होतो.

447
Powai Lake : पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी सव्वा अकरा कोटींची सफाई
Powai Lake : पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी सव्वा अकरा कोटींची सफाई
विशेष प्रतिनिधी,मुंबई

पवई तलावातील पाण्याचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आता यातील जलपर्णी (Powai Lake) वनस्पती तसेच जमिनीतून उगवलेल्या वनस्पती तसेच टाकाऊ पदार्थ काढण्यात येणार आहे. तलावातील पाण्यावर तरंगणाऱ्या या वनस्पती हार्वेस्टर यंत्र तसेच ऍम्फिबिअस यंत्राच्या मदतीने काढून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. या तरंगणाऱ्या वनस्पतीचा कचरा साफ करण्यासाठी तब्बल सव्वा अकरा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. आजवर मगरीमुळे येथील तलावाची पूर्णपणे सफाई होऊ शकलेली नाही, मग सव्वा अकरा कोटी रुपयांचा खर्च करून जलपर्णी काढली जाणार की या पैशांची सफाई होणार असा सवाल उपस्थित होत आहे. (Powai Lake)

यामुळे निर्माण होते जलपर्णी

पवई तलाव (Powai Lake) हा अत्यंत महत्त्वाचा तलाव असून शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आहे. या तलावाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे या तलावाची निगा राखून त्याचे सौंदर्य अबाधित ठेवणे व तलावातील जैवविविधता व जीवसृष्टी यांचे संगोपन व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु या तलावात जलपर्णी व इतर वनस्पतीचा प्रार्दुभाव होत असल्याने तसेच या तलावात सांडपाण्याचा निचरा होत आहे. शिवाय अनधिकृत कचरा व टाकाऊ पदार्थ टाकला जात असल्याने मोठ्याप्रमाणात जलपर्णी वनस्पती निर्माण होतात. (Powai Lake)

(हेही वाचा – Dadar : दादरमध्ये या भागातील शेतकरी महिलांना बसतोय महापालिका कारवाईचा फटका)

अशाप्रकारे काढली जाणार जलपर्णी

पवई तलावाची देखभाल करण्यासाठी तलावाच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून उगवलेल्या वनस्पती, टाकाऊ पदार्थ इत्यादी हार्वेस्टर यंत्र किंवा ऍम्फिबिअस यंत्रांच्या मदतीने एकत्रित करून किना-यावर आणून त्याची वाहतूक करून त्याची क्षेपण भूमींवर विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एस.के.डेव्हलपर्स यांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा एक टक्का दराने अधिक दरात ८. ३७ कोटी रुपयांमध्ये कंत्राट मिळवले असून विविध करांसह या कंत्राटाची रक्कम ११.१८ कोटी रुपयांमध्ये कंत्राट मिळवले आहे. संपूर्ण जलपर्णी ही सहा महिन्यांमध्ये काढणे अपेक्षित असून य तलावाची देखभाल पुढी १८ महिन्यांमध्ये करण्याची अट निविदेमध्ये आहे. यापूर्वी सन २०२१मध्ये अशाचप्रकारे जलपर्णी काढण्यासाठी बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पात्र ठरली. या कंपनीने विविध करांसह ११.२५ कोटी रुपयांमध्ये हे कंत्राट मिळवले होते.

जलपर्णी काढण्याची आवश्यकता काय?

जलपणींची बेसुमार वाढ तलावातील पाण्याचा पृष्ठभाग झाकून टाकते, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता आणि जैव-विविधता यांवर परिणाम होतो. सूर्यप्रकाशाचे पाण्यातील परावर्तन कमी होते त्यामुळे माश्यांचे खाद्य असणाच्या वनस्पतींची वाढ खुंटते तसेच तलावातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि तापमानात बदल दिसून येतो. तसेच डेंगू आणि मलेरिया चा प्रादुर्भाव करणाऱ्या डासांच्या निर्मितीस या जलपर्णी कारणीभूत ठरतात. परिणामी पाण्यातील मूळ, उपयोगी आणि शाश्वत वनस्पतींची वाढ कमी होऊ लागते. या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने पवई तलावाचे (Powai Lake) पुन्नरुज्जीवन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन काही दीर्घकालीन उपाययोजना व तातडीच्या उपाययोजनांची आखणी केली आहे. त्या अनुषंगाने, पवई तलावात येणारा सांडपाण्याचा निचरा कमी करण्यात यश मिळविले असून, पुढील काळात पवई तलावात येणारा दुषित पाण्याचा निचरा पुर्णपणे कमी करण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही सुरू असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.