Dadar : दादरमध्ये या भागातील शेतकरी महिलांना बसतोय महापालिका कारवाईचा फटका

तीन ते चार दशकांपासून बसणाऱ्या भाजी विक्री करणाऱ्या महिला कारवाईच्या भीतीखाली

645
Dadar : दादरमध्ये या भागातील शेतकरी महिलांना बसतोय महापालिका कारवाईचा फटका
Dadar : दादरमध्ये या भागातील शेतकरी महिलांना बसतोय महापालिका कारवाईचा फटका
विशेष प्रतिनिधी,मुंबई

दादरच्या (Dadar) जावळे मार्गावर मागील अनेक वर्षांपासून पालघर, सफाळे आणि कर्जत कसारा आदी भागांमधील महिला ताजी भाजी विक्रीसाठी घेऊन बसत असतात. मात्र, दादरमधील (Dadar) फेरीवाल्यांवरील कारवाईचा फटका सध्या ताजी भाजी घेऊन बसणाऱ्या शेतकरी महिलांना बसत आहे. आपल्या मळ्यात पिकणारी भाजी दादरकरांना (Dadar) उपलब्ध करून देणाऱ्या या महिला केवळ पाच तासच व्यवसाय करतात. परंतु एवढ्या लांबून दरमजल करत आणलेल्या ताज्या भाजीची विक्री घाबरतच करावी लागते. परिणामी त्यांना या भाजी विक्रीतून नफाही मिळत नसून महापालिका प्रशासन किमान या महिलांना जावळे मार्गावर शेतकऱ्यांच्या दर्जा देऊन त्यांना महापालिकेच्या कारवाईपासून संरक्षण देऊन बिनधास्तपणे व्यवसाय करण्याची मुभा दिली जाणार का असा सवाल आता दादरमधील रहिवाशांकडून केला जात आहे.

या भागांमधून येतात भाजी विकण्यासाठी महिला

दादर (Dadar) पश्चिम येथील गोल मंदिराजवळील जावळे मार्गावर पुस्तक गल्लीचा शेवटचा परिसर आणि जावळे मार्गावर पणशीकर स्वीट्स, तांबे उपहारगृहाच्या समोर मागील तीन ते चार दशकांपासून वसई, पालघर,सफाळे, डहाणू तसेच कर्जत कसारा आदी भागांमधून भाजी विक्री करणाऱ्या महिला व्यवसाय करत आहेत. या महिलांकडे ताजी पालेभाजी आणि इतर भाजी असल्याने दादरसह इतर भागांमधील जनता याठिकाणी आवर्जुन भेट देत भाजी खरेदी करत असतात.

या वसई, पालघरमधील सुमारे १० ते १२ महिला आणि कर्जत,कसारा आदी गावांमध्ये १२ ते १३ महिला या भाजी विक्री करता येत असतात.

(हेही वाचा – Tripura Government: सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवणाऱ्या वन अधिकाऱ्याचे निलंबन)

जप्त केलेली भाजी सोडवण्यास जाण्यास नसतो वेळ

आज भाजी विक्री करणाऱ्या या महिला दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील आहेत. या भागात भाजी विक्री करणाऱ्या महिलांच्या मुलगी, सुन आदी असून दादरमध्ये फेरीवाल्यांवर सुरु असलेल्या कारवाईचा फटका या शेतकरी महिलांनाही पडत आहे. या महिला दोन ते अडीच तासांचा प्रवास करता भाजी विक्रीला आणत असतात आणि रात्रीची ठराविक गाडी पुन्हा पकडून जाण्यासाठी आठ ते साडेआठ वाजता व्यवसाय बंद करत असतात. त्यामुळे केवळ चार ते पाच तासच या महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने महापालिकेने जप्त केलेली भाजीही ते सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. बऱ्याचदा जप्त केलेली माहिती गोदामात रात्री साडे आठ वाजेपर्यंत नेले जातात, परंतु त्याच वेळेत घरी जाण्याची घाई असल्याने जप्त केलेली भाजी सोडवण्याचा प्रयत्न या महिला करत नाही. परिणामी आधीच हातावर पोट असणाऱ्या या महिलांचे मोठे नुकसान होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.