-
प्रतिनिधी
राज्यातील लोकप्रतिनिधींचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर धोरण तयार करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. तसेच कालबाह्य झालेले सीसीटीव्हीवर महापालिका स्तरावर नियंत्रण ठेवले जाईल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधान परिषदेत दिली.
(हेही वाचा – जबलपुरातील जिममध्ये Conversion चा अड्डा; ट्रेनर अमनवर गंभीर आरोप)
कोल्हापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्ताव प्रलंबित असल्याचा मुद्दा सतेज पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. राज्यभरातील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींचे व्हायरल होत आहेत. सरकार यावर वचक ठेवण्यासाठी काय उपाययोजना करणार असा प्रश्न उपस्थित केला. भोयर (Pankaj Bhoyar) यांनी त्यावर उत्तर देताना, राज्यात विविध महत्त्वाच्या ठिकाणी विविध विभागांमार्फत सीसीटीव्ही लावले जात आहेत. गृह आणि आपत्ती निवारण विभागाला याची विशेषतः अधिक आवश्यकता भासत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच धोरण तयार करून संबंधित सीसीटीव्हीचे फुटेज कुणाला उपलब्ध द्यावे, याबाबत कार्यप्रणाली आखली जाईल, असे भोयर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला तसे निर्देश दिल्याची माहिती भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
(हेही वाचा – ‘७२ अधिकारी आणि मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात?’; आमदार Nana Patole यांच्या मागणीमुळे विधानसभेत खळबळ)
सीसीटीव्ही देखभाल – दुरुस्ती जिल्हा नियोजन समितीमार्फत
खाजगी आस्थापना मधील सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर दिले जाऊ नये, याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केले जाईल. त्याचप्रमाणे शासकीय आस्थापनांत सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार योग्य प्रकारे कार्यवाही केली जाईल, असे भोयर (Pankaj Bhoyar) यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

