ढोल-ताशा सरावाला ‘नियम’; Pune महानगरपालिका लवकरच जाहीर करणार नियमावली

72
ढोल-ताशा पथकांचा सराव पुण्यात
पुण्यातील ढोल-ताशा पथकांचा उत्साही सराव.

आगामी गणेशोत्सवाच्या (ganeshotsav) पार्श्वभूमीवर शहरातील नदीपात्र, महापालिकेच्या मोकळ्या जागा आणि शाळांच्या मैदानांवर ढोल-ताशा पथकांनी सराव सुरू केला आहे. मात्र, या सरावामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत काही तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (Pune)

(हेही वाचा – Kalyan च्या गांधारी परिसरातून विषारी कोब्रा जातीच्या नागाला जीवनदान)

पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली असून, ढोल-ताशा, लेझीम, टिपरी, झांजा आणि शंखनाद पथकांचे सादरीकरण हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. त्यासाठी गणेशोत्सवापूर्वी जवळपास दोन महिने शहरातील विविध भागांत नियमित सराव केला जातो. नदीपात्र, महापालिकेची मैदाने आणि इतर मोकळ्या जागांवर सराव होत असला, तरी काही पथके रस्त्याच्या कडेलाही सराव करत असल्याचे दिसून येते. निवासी वस्त्यांजवळ सराव होत असल्यास ध्वनीचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांनी सराव करताना कोणती काळजी घ्यावी, सरावासाठी कोणत्या विभागाची परवानगी आवश्यक असेल, सरावाची वेळ काय असावी, एका दिवसात किती वेळ सराव करता येईल, तसेच कोणत्या जागांचा वापर करता येईल, याबाबत सविस्तर नियमावली तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.

(हेही वाचा – Jammu-Kashmir: रामबनमध्ये सुरक्षा बॅरिकेड तोडून एसयूव्ही पसार, शोधमोहीम सुरू)

यासाठी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन, शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या उपायुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला असून, त्यानंतर सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात येणार आहेत. या नियमावलीमुळे ढोल-ताशा पथकांच्या सरावाला शिस्तबद्ध स्वरूप मिळण्याबरोबरच नागरिकांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.