PM Narendra Modi शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर; १५ हजार घरांचे लोकार्पण

या दौऱ्यात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव आणि भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

144
Modi Govt च्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी घोडदौड; विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

असंघटित कामगारांसाठी बांधलेल्या घराचे लोकार्पण आणि राज्यातील पाणी पुरवठा तसेच मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या म्हणजे शुक्रवार, १९ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. गेल्या आठवडाभरातील मोदी (PM Narendra Modi) यांचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. याआधी मोदी हे १२ जानेवारीला नाशिक, मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. (PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे शुक्रवारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सोलापुरात आगमन होईल. या दौऱ्यात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव आणि भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १ हजार २०१  कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध होणार आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Maratha-Kunbi Certificates : मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी शिबिरे घ्यावीत; डॉ. राजगोपाल देवरा यांचे निर्देश)

१० हजार लाभार्थ्यांना निधीचे वितरण

याशिवाय मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत सोलापुरातील १० हजार लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यात येईल. (PM Narendra Modi)

कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार यांच्या पुढाकाराने सोलापूर जिल्ह्यातील रे नगर, कुंभारी येथील असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान  आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुलांचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या  पहिल्या टप्प्यातील १५ हजार २४  घरांचे लोकार्पण शुक्रवारी मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. हा देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून असंघटित क्षेत्रातील ३० हजार कामगारांच्या घरकुलाचे  स्वप्न यामुळे साकार होत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ९ जानेवारी २०१९ रोजी झाले होते. मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.