Ajit Pawar : मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे!; अजित पवार यांचा निर्धार

महिलांनी जास्तीत जास्त मतदान केल्याने तीन राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महायुतीच्या माध्यमातून सामोरे जायचे असून त्यापद्धतीने कामाला लागा, असे आवाहन पवार यांनी केले. तसेच फेब्रुवारीनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असेही त्यांनी सांगितले.

137
NCP : अजित पवार गटाचा स्वराज्य सप्ताह
NCP : अजित पवार गटाचा स्वराज्य सप्ताह

आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी (१८ जानेवारी) व्यक्त केला. महिलांनी जास्तीत जास्त मतदान केल्याने तीन राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला महायुतीच्या माध्यमातून सामोरे जायचे असून त्यापद्धतीने कामाला लागा, असे आवाहन पवार (Ajit Pawar) यांनी केले. तसेच फेब्रुवारीनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असेही त्यांनी सांगितले. (Ajit Pawar)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचा महिला मेळावा गुरुवारी (१८ जानेवारी) येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. आपला देश पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली वेगाने विकास करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जात आहोत. त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्र त्यांच्या बरोबरीने पुढे गेला पाहिजे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. (Ajit Pawar)

मी शब्दाचा पक्का आहे. माझे काम रोखठोक असते. काम होणार की नाही हे तुम्ही दिलेल्या पत्रातील मजकूर वाचल्यावर समजते. त्यामुळे काहींना वाईट वाटते. मात्र मी कुणाला वार्‍यावर सोडत नाही. एकदा निर्णय घेतला की त्यापासून बाजूला जायचे नाही. आपल्याला सर्व घटकांना बरोबर घेऊन वाटचाल करायची आहे. आपला निर्णय पक्षाच्या हिताचा आणि राज्याच्या विकासासाठी असून राज्याचा अजेंडा तुमच्यासमोर ठेवला आहे. ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (Ajit Pawar)

(हेही वाचा – PM Narendra Modi शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर; १५ हजार घरांचे लोकार्पण)

पक्षाची बदनामी होता कामा नये 

आपल्याला राज्यात सामाजिक सलोखा राखायचा आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे प्रक्षोभक भाषणांना बळी पडू नका. आपल्याकडे वाचाळवीरांची संख्या वाढली आहे, त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. आपल्याला विकासाला महत्त्व द्यायचे आहे. एक सुसंस्कृत चेहरा आपल्याला राज्याला द्यायचा आहे, अशा शब्दात त्यांनी पक्षातील वाचाळवीरांना फटकारले. तुम्ही हलक्या कानाचे राहू नका. तुमच्याबद्दल मला आदर आहे. महिला योग्य पध्दतीने काम करतात हे चित्र निर्माण करा. पक्षाची बदनामी होता कामा नये याची काळजी घ्या, अशा सूचना अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्या. (Ajit Pawar)

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम,मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ आदी उपस्थित होते. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.