Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा दौऱ्यावर

ओडिशा रेल्वे अपघातातील (Odisha Train Accident) मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.

141
Odisha Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशा दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशाला (Odisha Train Accident) जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे ते ओडिशा अपघातातल्या जखमींची भेट घेणार आहेत आणि त्यांची विचारपूस करणार आहेत. ओडिशा या ठिकाणी तीन ट्रेन्सचा शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर कटकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

ओडिशा रेल्वे अपघातातील (Odisha Train Accident) मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. तसेच अपघातातील किरकोळ जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Murder : एकतर्फी प्रेमातून दिल्ली पुन्हा हादरली; तरुणाने केला तरुणीवर चाकू हल्ला)

ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोरनजीक शुक्रवार (२ जून) रोजी संध्याकाळी ७ वाजून २० मिनीटांनी तीन गाड्यांचा अपघात झाला. यात आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोरमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर त्याच्या डब्यांची शेजारच्या रूळांवरून धावणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला धडक बसली. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा अधिक वाढला.

हेही पहा – 

दरम्यान ओडिशातील रेल्वे अपघाताबद्दल, (Odisha Train Accident) पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भातील ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी, ओडिशातील अपघातग्रस्तांच्या शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून पंतप्रधानांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यासोबतच राष्ट्रपती मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड यांनी देखील घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.