PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच येणार ‘हक्काचा’ पैसा; राज्यभर साजरा होणार ‘पीएम किसान उत्सव दिवस’!

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच येणार 'हक्काचा' पैसा; राज्यभर साजरा होणार 'पीएम किसान उत्सव दिवस'!

123
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच येणार 'हक्काचा' पैसा; राज्यभर साजरा होणार 'पीएम किसान उत्सव दिवस'!
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच येणार 'हक्काचा' पैसा; राज्यभर साजरा होणार 'पीएम किसान उत्सव दिवस'!
प्रतिनिधी

​प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या(PM Kisan Yojana)२३ व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या २० जून २०२६ रोजी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे. याच निमित्ताने महाराष्ट्रातही २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.(PM Kisan Yojana)

​या उपक्रमाची माहिती देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. या अनुषंगाने गावस्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते शेतकऱ्यांना या सोहळ्यात आभासी पद्धतीने जोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच, गावपातळीवर विशेष शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करून त्यांना योजनेच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली जाणार आहे.(PM Kisan Yojana)

(हेही वाचा – Operation Tiger नंतर आता ‘ऑपरेशन घड्याळ’? शरद पवारांच्या गोटातील ‘इतक्या’ खासदारांच्या फुटीची तारीखच ठरली! )

​कृषी मंत्र्यांनी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार संलग्नता, ई-केवायसी आणि बँक खात्याची अद्ययावत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ‘Know Your Status (KYS)’ या सुविधेचा वापर करून आपल्या हप्त्याची स्थिती तपासून घ्यावी,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.(PM Kisan Yojana)

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभाग या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सोशल मीडिया, वर्तमानपत्रे आणि विविध संवाद माध्यमांतून योजनेची व्यापक जनजागृती केली जाणार आहे. २० जून रोजी होणाऱ्या या उत्सवात राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.(PM Kisan Yojana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.