
प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बसलेला मोठा धक्का आणि ६ खासदारांनी शिंदे गटात केलेला प्रवेश यामुळे राज्याच्या राजकारणात आधीच मोठा भूकंप आला आहे. दोन्ही शिवसेना आपला वर्धापन दिन साजरा करत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर'(Operation Tiger)यशस्वी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, या राजकीय उलथापालथीची धूळ खाली बसत नाही तोच, आता थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी बंडखोरी होणार असल्याचा खळबळजनक दावा समोर आला आहे.(Operation Tiger)
ठाकरे गटातील फुटीनंतर राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष ‘अलर्ट मोड’वर गेले आहेत. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी एका मोठ्या राजकीय ‘ऑपरेशन’चे संकेत दिले आहेत. त्यांनी थेट आकडा आणि तारीख जाहीर करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार गटाचे तब्बल ५ खासदार आणि काही आमदार आपल्या संपर्कात असून, ते अजित पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. येत्या १२ डिसेंबरपर्यंत हे सर्वजण आमच्या पक्षात प्रवेश करतील, असा मोठा दावा आत्राम यांनी केला आहे.(Operation Tiger)
शरद पवार गटातील या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी योग्य ते ‘ऑपरेशन’ करावे लागेल, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे ठाकरे गटाला खिंडार पाडले, त्याच धर्तीवर आता अजित पवार गट देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पाडण्याच्या तयारीत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. धर्मराव बाबा आत्राम यांच्या या दाव्यामुळे आता हिवाळ्याच्या तोंडावर १२ डिसेंबरला महाराष्ट्राच्या राजकारणात खरोखरच आणखी एक मोठा राजकीय स्फोट होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.(Operation Tiger)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
