Manipur: खंडणी आणि स्फोटक पदार्थांचा पुरवठा केल्याप्रकरणी ८ दहशतवाद्यांना अटक

71
Manipur: खंडणी आणि स्फोटक पदार्थांचा पुरवठा केल्याप्रकरणी ८ दहशतवाद्यांना अटक
Manipur: खंडणी आणि स्फोटक पदार्थांचा पुरवठा केल्याप्रकरणी ८ दहशतवाद्यांना अटक

Manipur: मणिपूरमधील दूर्गम भागातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खंडणी वसूल करणे तसेच शस्त्रे आणि स्फोटक पदार्थाचा पुरवठा करण्यात कथित सहभाग असल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी एका प्रतिबंधित संघटनेच्या दोन गटांमधील आठ अतिरेक्यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेकायदेशीर घोषित केलेल्या ‘केसीपी (पीपल्स वॉर ग्रुप)’ या संघटनेच्या चार सदस्यांना इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून हँड ग्रेनेड पुरवल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्वजण इम्फाल पूर्व भागातीलच रहिवासी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – Rural Roads : ग्रामीण विकासाला मिळणार चालना; आर्थिक वर्षात रस्ते पूर्ण करण्याचे लक्ष्य

सुरक्षा दलांनी काकचिंग जिल्ह्यातूनही बंदी घातलेल्या ‘केसीपी (एमएफएल)’ या संघटनेच्या चार सक्रिय सदस्यांना अटक केली आहे; त्यांच्यावर खंडणी वसुली आणि शस्त्रपुरवठ्यात सामील असल्याचा आरोप आहे.

हजारो लोक बेघर
मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी नुकतेच सांगितले होते की, ज्या लोकांकडे बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांचे निःशस्त्रीकरण केले जात नाही तोपर्यंत राज्यात शांतता निर्माण होणे अवघड आहे.सुरक्षा दलांकडून लुटण्यात आलेली आणि बेकायदेशीरपणे खरेदी केलेली बंदुकां सारखी अवैध शस्त्रे, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये सुरू झालेल्या वांशिक हिंसेच्या सुरुवातीपासूनच वापरली जात आहेत. दोन वर्षापूर्वी वांशिक हिंसाचार उसळल्यापासून सुरक्षा दले मणिपूरमध्ये सातत्याने शोध मोहिमा राबवत आहेत. मे २०२३ पासून मैतेई आणि कुकी-झो समुदायांदरम्यान सुरू असलेल्या या वांशिक हिंसेत आतापर्यंत २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.