Piyush Goyal : आजचा दिवस हा केवळ नोकरी मिळण्याचा नाही तर देशाच्या विकासात योगदान देण्याची सुवर्णसंधी असल्याचे विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल(Piyush Goyal) यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल(Piyush Goyal) यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, स्टँड-अप इंडिया, डिजिटल इंडिया अशा योजनांद्वारे युवकांना रोजगार, व्यवसाय, स्टार्ट-अप संधी उपलब्ध झाल्या आहेत.(Piyush Goyal)
ते(Piyush Goyal) म्हणाले, गेल्या ११ वर्षांत भारताने जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. भारत टॉप ५ अर्थव्यवस्थांमध्ये असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू, असे सांगतानाच अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तरुणांनी प्रामाणिकपणे देशसेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशभरातील तरुणांसाठी सरकारी सेवेत सहभागी होण्याची ऐतिहासिक संधी निर्माण झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५१,००० सरकारी नोकऱ्यांच्या भरती महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
(हेही वाचा छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये, पंतप्रधान Narendra Modi यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले… )
केंद्रीय मंत्री म्हणाले, पंतप्रधान मोदींनी २०२२ मध्ये विकसित भारताचा पाया घातला आहे. त्यांच्या नेतृत्वात आपण ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास’ या मंत्राने देशाला पुढे नेऊ. केंद्रीय मंत्री गोयल(Piyush Goyal) यांनी उपस्थितांना आवाहन केले की, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एक कुटुंब म्हणून काम करूया. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Piyush Goyal)
Join Our WhatsApp Community

