Liquor Prices Increase : आता मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार; जाणून घ्या कारण

105
Liquor Prices Increase : आता मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार; जाणून घ्या कारण

बार आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या अल्कोहोलयुक्त पेयांची (Liquor Prices Increase) किंमत येत्या 1 नोव्हेंबरपासून वाढणार आहे. कारण राज्य सरकारने त्यावरील मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट सध्याच्या 5% वरून 10% पर्यंत वाढविला आहे.

सध्या, राज्यभरातील 18,000 बार आणि रेस्टॉरंट्समध्ये (Liquor Prices Increase) दिल्या जाणाऱ्या मद्यावर व्हॅट 5% आहे. तर 4 स्टारपेक्षा जास्त असलेल्या हॉटेल्समध्ये दिल्या जाणाऱ्या मद्यावर 20% कर आहे.

सरकारने शुक्रवारी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला. बारमधील मद्यदरात वाढ होणार असली तरी स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तेथील व्हॅट (Liquor Prices Increase) आधीपासूनच २० टक्के इतका आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या प्रतिसादामुळे सुरुवातीला मद्यविक्रीमध्ये (Liquor Prices Increase) थोडी घट होण्याची शक्यता आहे, असे जीएसटी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. तब्बल 12 वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Nitin Gadkari : मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार, नितीन गडकरींची कबुली)

सरकारने व्हॅटमध्ये (Liquor Prices Increase) वाढ केल्यानंतर बारचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सरकारने आधीच अबकारी परवाना शुल्क वाढवल्याने व्यावसायावर ताण आलेला असताना आता व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने मद्याचे दर वाढणार असून याचा व्यावसायावर परिणाम होणार आहे, असं बारचालकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा रेस्टॉरंटवर (Liquor Prices Increase) मोठा परिणाम होणार असून यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारावरही विपरीत परिणाम होईल, असं आहार संघटनेचे प्रमुख सुकेश शेट्टी यांनी म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.