जमिनीचा भाग खचला : बांधकाम व्यवसायिकाला वाचवून महापालिकेच्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न?

263
जमिनीचा भाग खचला : बांधकाम व्यवसायिकाला वाचवून महापालिकेच्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न?

पश्चिम द्रुतगती महामार्गावर मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या भागातील माती खचली असून रस्त्यालगतची बंदिस्त पर्जन्य जलवाहिनी बंद राहिल्याने हे पावसाचे पाणी मागे फिरून स्थानकालगतचा भाग खचला गेला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेचे खापर महापालिकेच्या अंगावर फोडण्याचा प्रयत्न असून प्रत्यक्षात विकासकाचे काम सुरू असतांना ही रस्त्यालगतची बंदिस्त पर्जन्य जलवाहिनीतील बंद पडून त्यातील पाण्याचा प्रवाह रोखला गेला. त्यामुळे या घटनेला विकासकाचा सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम जबाबदार असून, विकासकाला वाचवण्यासाठी याचे खापर महापालिकेवर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या कामाला इमारत प्रस्ताव विभागाच्या वतीने स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली असून आर मध्य महापालिका विभाग कार्यालयाच्या वतीने या बांधकाम विकासकाविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मागाठाणे मेट्रो रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार २ जवळील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या अर्थात (स्ट्रॉमवॉटर ड्रेन)चे चेंबर स्थानकाचे जिने आणि एस्केलेटरच्या पायाच्या अगदी जवळ आहे. या पर्जन्य जल वाहिनीच्या चेंबरला लागूनच एका बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या खोल खोदकामामुळे आजूबाजूची माती कोसळून चेंबरच्या भिंतीला तडे गेले असे दिसून आले. यामुळे बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या भागात यातील पाणी वाहून जात असून, ड्रेन चेंबर आणि पायऱ्या व एस्केलेटरचा पाया आणखी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. त्यामुळे एकप्रकारे विकासकाला सेफ झोन मध्ये उभे करण्याचा प्रयत्न होत आहे.

(हेही वाचा – भाजप-राष्ट्रवादी युती ठरली होती, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट)

मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या रस्त्याच्या बाजूने पावसाळी पाणी वाहून नेणारी द्रुतगती महामार्गच्या पश्चिमेकडील सर्व्हिस रोड च्या बाजूने जाते. ही वाहिनी बंदिस्त असून येथे विकासकाने केलेल्या खोल खोदाई कामा ही नाली कोसळली. परिणामी पावसात पाण्याच्या प्रवाह पुढे न जाता तो उलटा फिरला आणि चेंबर मधून बाहेर येथील जमिनीचा भाग खचला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर परिमंडळ उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या निर्देशानुसार या बांधकाम विकासकाला विभाग कार्यलयाच्या वतीने काम थांबवण्याचे नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांनी सुरक्षेची उपाययोजना करण्याची हमी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली होती.

पूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या रस्त्यांची आणि त्याच्या सेवा रस्त्यावरील पर्जन्य जलवाहिनीच्या देखभालीची जबाबदारी एमएमआरडीए आणि एमएमएमओसिएलची होती. परंतु मागील नोव्हेंबर २०२२ पासून हा मार्ग महापालिकेच्या ताब्यात आला असून यावरील पर्जन्य जलवहिनी सफाई व देखभाल विभागीय कार्यालय आणि रस्त्याची देखभाल रस्ते विभागाकडे सोपवण्यात आली. त्यानुसार आर मध्य विभाग कार्यालयाच्या वतीने याची सफाई करण्यात आली होती. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्प कामामुळे ही नाली बंद झाल्याने ही घटना घडल्यानंतर इमारत प्रस्ताव विभागाच्या वतीने काम थांबवण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे, तर आर मध्य विभाग कार्यालयांच्या वतीने संबंधित विकासक विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. विकासकाच्या बांधकामामुळे ही नाली बंद झालेली असताना याचे खापर महापालिकेच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.