Vidhan Sabha Election 2024: 85 ते 90 जागा मागण्याचा आमचा विचार – प्रफुल्ल पटेल

प्रफुल पटेल यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाष्य केले.

121
Vidhan Sabha Election 2024: 85 ते 90 जागा मागण्याचा आमचा विचार - प्रफुल्ल पटेल
Vidhan Sabha Election 2024: 85 ते 90 जागा मागण्याचा आमचा विचार - प्रफुल्ल पटेल

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आम्ही आणि जुनी राष्ट्रवादी व आमचे सहकारी असे 57 आमदार आहेत. त्या अनुषंगाने ज्याप्रमाणे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, त्याप्रमाणे 85 ते 90 जागा मागण्याचा आमचा विचार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी म्हटले आहे. ते गोंदियामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Vidhan Sabha Election 2024)

शिवसेना आणि काँग्रेस 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत यावर बोलताना पटेल म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाने सुरुवातीला युती होण्यापूर्वी 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्ही सुद्धा 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. जेव्हा आपण युतीमध्ये बसतो तर त्यामध्ये वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात. पण युती होण्यापूर्वीच आपण 288 जागांवर तयारी ठेवावी लागते असे प्रत्येक पक्षांचे धोरण असते, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – पराभव जिव्हारी लागल्याने रडीचा डाव, EVM प्रकरणी Ravindra Waikar यांचा पलटवार)

ज्यांच्याकडे बहुमत असते त्याच लोकांना सरकार स्थापनेकरिता राष्ट्रपती बोलवत असतात. त्याप्रमाणे राष्ट्रपती यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली आणि आमच्याकडे 292 खासदारांचे समर्थन आहे. त्यामुळे निश्चितच लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएकडेच राहील. राहिला उपाध्यक्ष पदाचा प्रश्न तर 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा उपाध्यक्ष पद हे विरोधकांना देण्यात आले नव्हते. विरोधकांना उपाध्यक्ष पद द्यावे, असा कोणताही नियम नाही. सरकार आणि विरोधकांमध्ये सामंजस्य असेल तरच असा विचार केला जाऊ शकतो. सध्यातरी अशी परिस्थिती नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले. (Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा – Rain Update: राज्यात चिंता वाढवणारी बातमी; पावसाने पुन्हा मारली दांडी!)

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना नक्कीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे पटेल म्हणाले. अजूनही काही महिने शिल्लक आहेत आणि अनेक जागा सुद्धा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अधिक जोमाने सरकार काम करेल, असे पटेल म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. राष्ट्रवादीला रायगड लोकसभा मतदारसंघातील एकमेव जागा जिंकता आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची घोर निराशा झाली. तरीही पराभवाने खचायचं नसतं, आता विधानसभेच्या तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्यामुळे, महायुतीतमध्ये आता विधानसभेच्या जागावाटपावरुन खलबतं सुरू होणार आहेत. देशामध्ये नुकताच पार पडलेले लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला अपेक्षित यश आलं नाही. महाराष्ट्रात देखील परिस्थिती वेगळीच राहिली. मात्र, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील, विधानसभा निवडणुकीमध्ये पिक्चर बदलेल असेही पटेल यांनी म्हटलं. राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आलं तर ते मलाच मिळणार असा दावा पटेल यांनी केला आहे. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असेही पटेल म्हणाले. (Vidhan Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.