जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा; Amit Shah यांचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.

117
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा; Amit Shah यांचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरुद्धची (Jammu and Kashmir terrorism) लढाई निर्णायक टप्प्यात आहे. अलीकडील घटनांवरून असे दिसून येते की दहशतवादाला आता अतिरेकी हिंसाचाराच्या अत्यंत संघटित कृत्यांपासून केवळ छुप्या युद्धापर्यंत मर्यादित रहायला भाग पडत आहे. आता हे देखील मुळापासून उखडून टाकण्याचा आमचा निर्धार आहे, असे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा म्हणाले. (Amit Shah)

शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval), जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pandey), केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्कर प्रमुख (नियुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह सीएपीएफचे महासंचालक, मुख्य सचिव, जम्मू-काश्मिरचे पोलिस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – Kalina land Case : Chhagan Bhujbal यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश)

या बैठकीत अमित शाह यांनी अमरनाथ यात्रेसाठी संपूर्ण सुरक्षा कवच, यात्रा मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था, महामार्गांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करणे, सर्व तीर्थक्षेत्रांवर दक्षता वाढविणे आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटन स्थळांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याशिवाय, गृहमंत्र्यांनी अलीकडील दहशतवादी हल्ले आणि जम्मू प्रदेशातील सध्याची सुरक्षा परिस्थिती, यावर सविस्तर अहवाल मागवला आहे.

(हेही वाचा – Indian Air Force : रेड फ्लॅग हवाई युद्ध सरावात भारतीय हवाई दलाच्या ताफ्याचा यशस्वी सहभाग)

असुरक्षित क्षेत्रे ओळखून अशा क्षेत्रांच्या सुरक्षेची चिंता दूर करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील अखंड समन्वयावर शहा यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार करत सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट होऊन मोठे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. काश्मीर खोऱ्यातील पर्यटकांच्या वाढत्या विक्रमी संख्येवरून, इथे कायदा आणि सुव्यवस्थेत झालेली सुधारणा दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये विक्रमी मतदान घडवून आणलेल्या लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शाह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाचे कौतुक केले.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.