Pakistan : संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर पाकचा थयथयाट; म्हणे, भारताला बेकायदेशीर कारवायांसाठी जबाबदार धरणे आवश्यक

Pakistan : दहशतवाद्यांनी भारतातील शांतता भंग करण्याचा किंवा दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. जर ते पाकिस्तानात पळून गेले, तर भारत त्यांना मारण्यासाठी शेजारच्या देशात घुसेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ठणकावले होते.

132
Pakistan : संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर पाकचा थयथयाट; म्हणे, भारताला बेकायदेशीर कारवायांसाठी जबाबदार धरणे आवश्यक
Pakistan : संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर पाकचा थयथयाट; म्हणे, भारताला बेकायदेशीर कारवायांसाठी जबाबदार धरणे आवश्यक

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या पाकिस्तानात (Pakistan) घुसून दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या वक्तव्यावर पाकिस्तानने कांगावा चालू केला आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “पाकिस्तानी नागरिकांना मनमानीपणे दहशतवादी (terrorist in pakistan) म्हणून लेबल करणे आणि त्यांना शिक्षा करण्याचा दावा करणे हे ते दोषी असल्याचे सिद्ध करते. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला त्याच्या बेकायदेशीर कारवायांसाठी जबाबदार धरणे आवश्यक आहे”, असा थयथयाट पाकने केला आहे.

(हेही वाचा – Lok Sabha election 2024 : 95 वर्षाच्या आजोबांनी केले मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन)

काय म्हणाले होते संरक्षणमंत्री ?

दहशतवाद्यांनी भारतातील शांतता भंग करण्याचा किंवा दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. जर ते पाकिस्तानात पळून गेले, तर भारत त्यांना मारण्यासाठी शेजारच्या देशात घुसेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 5 एप्रिल रोजी ठणकावले होते. ‘भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमध्ये अनेक लोकांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे’, असे वृत्त द गार्डीयनने (The Guardian) दिले आहे. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर पाकने थयथयाट चालू केला आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ‘द गार्डियन’चे वृत्त फेटाळले आहे. टार्गेट किलिंग हे भारताच्या परराष्ट्र धोरणात नाही. आरोप खोटे आहेत, असे जयशंकर म्हणाले आहेत. (Pakistan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.