ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच काहिली

106

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. काही मिनिटांच्या प्रवासातही मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. हा संपूर्ण आठवडा उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका नाही. शनिवारपर्यंत मुंबईत ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून हलका पाऊस राहील. नैऋत्य मोसमी वारे उत्तर भारतातील बहुतांश भागांतून परतले. सोमवारी केंद्रीय वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांतील काही भागांतून नैऋत्य मोसमी वारे परतले तसेच मध्य प्रदेशांतील वायव्य भागांतून गुजरात राज्यातील कच्छ भागातून सुद्धा नैऋत्य मोसमी वारे परतले. उत्तर प्रदेशातील पश्चिम भागांतूनही मान्सून परतल्याचे केंद्रीय वेधशाळेने सोमवारी जाहीर केले.

( हेही वाचा : अकरावी प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)

मुंबईत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसवर असले तरीही मंगळवारर्यंत कमाल तापमान ३३ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला. सोमवारी किमान तापमान २४ अंश सेल्सिअसवर असले तरीही येत्या दिवसात किमान तापमानही एका अंशाने वाढेल. वीकेण्डला किमान तापमान २५ तर कमाल तापमान ३२ अंशापर्यंत राहील, असा अंदाजही केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला. राज्यातही आता परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण दिसून येत आहे. विदर्भात पावसाचा जोर थोडा जास्त राहील. सोमवारी दक्षिण कोकणासह उत्तर आणि मध्य-पश्चिम महाराष्ट्रात वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत आढळला. राज्यभरात अधूनमधून विविध भागांत वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत दिसून येईल. विदर्भात यंदाच्या आठवड्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल. त्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.