WhatsApp : जबरदस्त! आता WhatsApp वरचे मेसेजेस Edit करा

व्हाट्सएप हा मेटा कंपनीचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. मागच्या काही दिवसांपासून मॅसेज एडिट फिचर लॉन्च करण्याविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या.

113

मोबाईलवर व्हाट्सएप वापरणं हे आपल्या आयुष्याचाच एक भाग बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हाट्सएप लवकरच एक मॅसेज एडिट करण्याचे एक फिचर रिलीज करणार असल्याचे समोर आले आहे. तसे सांगणारा एक व्हिडिओ कंपनीनेच शेअर केला आहे.

व्हाट्सएप हा मेटा कंपनीचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. मागच्या काही दिवसांपासून मॅसेज एडिट फिचर लॉन्च करण्याविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. आता मात्र समोरून मेटाकडूनच या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. व्हाट्सएप युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.

(हेही वाचा मुंबई महापालिकेत ६६४ अभियंत्यांची पदे भरणार; लवकरच प्रकाशित होणार जाहिरात)

मागच्या काही दिवसांपासून व्हाट्सएप मॅसेज एडिट करण्यासाठी वापरात येणाऱ्या फिचरबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. पण आता या बातमी संबंधित व्हिडीओ कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामुळे व्हाट्सएपचे हे फिचर अपडेट कन्फर्म झाले आहे. या व्हिडिओमध्ये मिळालेल्या माहितीनुसार हा मॅसेज एडिटिंग फिचर आयओएस आणि अँड्रॉईड युजर्ससाठी रिलीज केला जाणार आहे.

व्हाट्सएपने बीटा टेस्टर्ससाठी हे फिचर रोलआऊट केले असून व्हाट्सएपवर लक्ष ठेवणारी कंपनी WABtainfo हे टेस्टर्स मॅसेज एडिटिंग फिचर वापरत आहेत. हल्ली आपण वापरत असलेल्या व्हाट्सएपमध्ये एकदा मॅसेज सेंड केला की तो बदलण्याची काहीच तरतूद नाहीय. पण हे फिचर रिलीज झाल्यानंतर युजर्स पाठवलेला मॅसेज चुकला असेल तर तो एडिट करू शकतात. ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. याप्रमाणेच कंपनी युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन आणखी वेगवेगळे फीचर्स लॉन्च करू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.