Samruddhi Expressway: आता मुंबई-शेगाव प्रवास अवघ्या ७ तासांत, समृद्धी महामार्गावर द्रुतगती मार्ग विकसित केले जाणार

353
Samruddhi Expressway: आता मुंबई-शेगाव प्रवास अवघ्या ७ तासांत, समृद्धी महामार्गावर द्रुतगती मार्ग विकसित केले जाणार
Samruddhi Expressway: आता मुंबई-शेगाव प्रवास अवघ्या ७ तासांत, समृद्धी महामार्गावर द्रुतगती मार्ग विकसित केले जाणार

वीकेंड म्हटलं की, मुंबईकरांची पावले वळतात ती पर्यटन स्थळांबरोबरच देवदर्शनाकडे. आतापर्यंत पर्यटनासाठी लोणावळा- खंडाळा आणि देवदर्शनासाठी शिर्डी, नाशिक, जेजूरी हीच जवळची ठिकाणे होती. यामध्ये आता अजून एका ठिकाणाची भर पडणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गाला (Samruddhi Expressway) लागून सिंधखेडराजा- शेगाव असा तब्बल १०९ किलोमीटर लांबीचा चारपदरी महामार्ग उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे.

त्यामुळे मुंबई-सिंदखेड राजा हा प्रवास अवघ्या ५ तासांत, तर तेथून पुढे शेगावचा प्रवास २ तासांत सहजपणे पूर्ण होऊ शकणार आहे. परिणामी भक्तांबरोबरच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा – R Ashwin : तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अश्विनचं कमबॅक)

समृद्धी महामार्गावर ८ ठिकाणी द्रुतगती मार्ग विकसित
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहने ताशी १२० किलोमीटर वेगाने सुसाट धावत आहेत; पण समृद्धी मार्गावरील प्रवास संपल्यानंतर नाशिक, मनमाड, संभाजीनगर, बुलढाणा अशा विविध ठिकाणांहून पुढे जाताना बराचसा वेळ लागतो. त्याची दखल घेत एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गावर ८ ठिकाणी द्रुतगती मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंदखेडराजापासून शेगावपर्यंत प्रशस्त महामार्ग
त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथून शेगावपर्यंत १०९ किमीचा चारपदरी ग्रीनफील्ड महामार्ग तयार करण्याची योजना असून त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना कल्याणपासून पुढे सिंदखेडराजापर्यंत सुमारे ४१३ किलोमीटरच्या प्रवासाला चार-पाच तास लागणार आहेत, तर सिंदखेडराजापासून शेगावपर्यंत प्रशस्त महामार्ग होणार असल्याने हा प्रवास आवघ्या २ तासांत पूर्ण करता येणार असल्याची माहितील एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.