North East Mumbai Lok Sabha Constituency : भांडुप आणि घाटकोपर पश्चिममध्ये मतदारांची घटली संख्या

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून सध्या महायुतीच्यावतीने भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

132
North East Mumbai Lok Sabha Election 2024 : संजय पाटील यांना उबाठा शिवसैनिकच आपले मानतात?

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य लोकसभा मतदार संघातील मतदारांची संख्या मागील २०१९च्या तुलनेत मतदारांची संख्या काही प्रमाणात वाढली असली तरी भांडुप पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम या विधानसभा मतदार संघात चक्क मतदारांची संख्याच घटल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही विधानसभा मतदार संघात अनुक्रमने ६९८० व ८९७ मतदारांची संख्या ही २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत कमी असल्याचे पहायला मिळत आहे. (North East Mumbai Lok Sabha Constituency)

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून सध्या महायुतीच्यावतीने भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या मतदार संघात आता मराठी विरुध्द अमराठी उमेदवार असा अपप्रचार सुरु आहे. मात्र, या लोकसभा मतदार संघातून २०१९च्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या १५ लाख ८८ हजार ३३१ एवढी होती, परंतु आता २०२४च्या निवडणुकीकरता एकूण मतदारांची संख्या ही १६ लाख ०२ हजार ५८८ एवढी झालेली आहे. (North East Mumbai Lok Sabha Constituency)

या निवडणुकीत मुलुंड विधानसभा क्षेत्रात ९६८, विक्रोळी विधानसभा क्षेत्रात ८०४६,घाटकोपर पूर्वमध्ये ६००८ आणि मानखुर्द शिवाजीनगर मतदार क्षेत्रात ७,१३२ एवढ्या मतदारांची संख्या सन २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली आहे. तर भांडुप पश्चिम विधानसभा क्षेत्रात ६९८० आणि घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रात ८९७ एवढ्या मतदारांची संख्या घटलेली पहायला मिळत आहे. (North East Mumbai Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar Film : पनवेलमधील २ हजार नागरिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन)

उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ
  • मतदारांची संख्या सन २०१९ : १५,८८, ३३१
  • मतदारांची संख्या सन २०२४ : १६,०२,५८८

पुरुष मतदारांची संख्या

  • सन २०१९ : ८,६४,६५७
  • सन २०२४ : ८,६०,८५०

महिला मतदारांची संख्या

  • सन २०१९ : ७,२३,५३४
  • सन २०२४ : ७,४१,५०४ (North East Mumbai Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.