Swatantra Veer Savarkar Film : पनवेलमधील २ हजार नागरिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन

204
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या (Swatantra Veer Savarkar Film) चित्रपटाचा विशेष शो पनवेलमधील २ हजार प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आले. हे शो अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पनवेल शाखाच्या वतीने करण्यात आले होते. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य हे तरुण पिढीमध्ये रुजविणे अत्यंत गरजेचे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून वीर सावरकर यांचे विचार अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहचतील. स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar Film) या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते रणदीप हुड्डा यांच्या अथक परिश्रमातून न भूतो न भविष्यती अशी अजरामर कलाकृती या चित्रपटाच्या रूपाने जन्माला आली आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रातील ओरियन मॉल, के.के. सिनेमा आणि लिटिल वर्ल्ड सिनेमा येथे तब्बल २००० नागरिकांसाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटच्या (Swatantra Veer Savarkar Film) विशेष शो चे आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पनवेल शाखेच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांची प्रमुख उपस्थित होती. त्यांचे स्वागत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. या वेळी भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर भाजपाचे अध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमित ओझे, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, ऍड. नरेश ठाकूर, ब्रिजेश पटेल, संजय भगत, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, अमर उपाध्याय, नितेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.