Raj Thackeray : मनसेचा मंगळवारी पाडवा मेळावा; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

महायुतीसोबत गेल्यास राज ठाकरे यांच्या पक्षाला दक्षिण मुंबई लोकसभेची जागा अथवा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यास रिक्त होणारी राज्यसभेची जागा मनसेला दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

97
Raj Thackeray : मनसेचा मंगळवारी पाडवा मेळावा; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात सामसूम आहे. २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन लोकसभा निवडणूक न लढणाऱ्या मनसेने २०२४ च्या निवडणुकीतील भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही मनसेची राजकीय भूमिका गुलदस्त्यात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचा पाडवा मेळावा मंगळवारी मुंबईत होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) काय भूमिका मांडतात याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray)

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराचा झंझावात सुरु झाला आहे. तर आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून येथील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. उर्वरित तीन टप्प्यातील काही मतदारसंघांच्या जागावाटपावरून महाविकास आघाडी तसेच महायुतीत मतभेद आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही बहुतांश मतदारसंघात उमेदवार जाहीर केल्याने काही मतदारसंघात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. मात्र निवडणुकीवर प्रभाव टाकून राज्यातील राजकीय गणिते बदलण्याची क्षमता असणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांना दिलेले मत मोदींना जाईल, तर सुप्रिया सुळेंना दिलेले मत राहुल गांधींना जाईल; फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार)

राज्यसभेची जागा मनसेला दिली जाणार? 

अमित शहा यांच्या भेटीनंतर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राज ठाकरे (Raj Thackeray) महायुती सोबत जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीसोबत गेल्यास राज ठाकरे यांच्या पक्षाला दक्षिण मुंबई लोकसभेची जागा अथवा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यास रिक्त होणारी राज्यसभेची जागा मनसेला दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत मनसेला काही जागा सोडल्या जाणार असल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात या शक्यतांची चर्चा असताना राज ठाकरे यांनी मात्र शांत आहेत. आजच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे आपले मौन सोडतील आणि भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे मेळावा मनसे कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे. (Raj Thackeray)

मनसेच्या मेळाव्याचा टीझर समाज माध्यमांवर सध्या गाजत आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणतात, “गेल्या काही आठवड्यापासून आपल्या पक्षाबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे पाहत आहे. तुम्हालाही अनेकांनी प्रश्न विचारुन भंडावून सोडलं असेल. मात्र, या सगळ्यावर बोलण्याची वेळ आलीय. नक्की काय घडतेय, घडवले जातेय हे सांगण्याची वेळ आली आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर या, आपल्याशी मला बोलायचे आहे”. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Vistara Cancellations : विस्ताराने आपली १० टक्के उड्डाणं केली रद्द)

राज ठाकरे आमच्या सोबत येतील : फडणवीस

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मनसेच्या महायुतीतील सहभागाबाबत नागपूर येथे माध्यमांशी बोलताना भाष्य केले. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हापासून आमची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सोबत जवळीक वाढली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले. (Raj Thackeray)

यापूर्वी मनसेबरोबर युतीसंदर्भात आमच्या चर्चा झाल्या आहेत. राज ठाकरे हे पहिले व्यक्ती होते की २०१४ साली त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जाहीरपणे भूमिका घेतली होती. त्यानंतर मधल्या काही काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली. मात्र, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे विकास केला ते पाहता मला विश्वास आहे की राज ठाकरे यांची मनसेही महायुतीसोबत निश्चित येईल. याबाबतचा निर्णय राज ठाकरे (Raj Thackeray) यांना घ्यायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.