New Year 2024 : २०२३ सरले; २०२४ मध्ये काय काय घडणार ?

204
New Year : २०२३ सरले; २०२४ मध्ये काय काय घडणार ?
New Year : २०२३ सरले; २०२४ मध्ये काय काय घडणार ?

२०२३ सरले आहे. २०२४ हे (New Year) वर्ष फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशासाठीच महत्त्वाचे ठरणार आहे. २०२४ मध्ये राज्य आणि देश पातळीवर अवकाश (Space), धर्म (religion), राजकारण (politics), समाजकारण (Social), क्रीडा (Sports), परिवहन (Transportation) या क्षेत्रांत देश आघाडी घेणार आहे. पाहूया २०२४ मध्ये कोणत्या क्षेत्रात काय घडणार ?

(हेही वाचा – Atul Bhatkhalkar : २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा)

अवकाश संशोधन

६ जानेवारीला इस्रोची सूर्यमोहिम आदित्य-एल१ लॅग्रेंज पॉइंटरवर पोहोचणार आहे. त्या शिवाय नव्या वर्षांत गगनयान-१, मंगळयान-२, शुक्रयान-१ चे प्रक्षेपण होणार आहे.

राजकीय
  • शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १० जानेवारीपर्यंत निकाल देणार आहेत.
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या विरोधातही याचिका चालू आहे. याच वर्षात राष्ट्रवादी कुणाची, हे ठरणार आहे.
  • लोकसभा निवडणुकीसह, आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे.
  • भारताशिवाय अमेरिका, रशिया, इंग्लंड, पाकिस्तानसह ७० देशांमध्ये मतदान होणार आहे.

(हेही वाचा – BJP : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी मोडणार राजीव गांधींचा रेकॉर्ड)

धार्मिक
  • अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
  • काशी येथील ज्ञानवापी प्रकरण वाराणसी सत्र न्यायालयात प्रगतीपथावर आहे. यंदाच्या वर्षी त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
परिवहन
  • समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी मार्ग सुरू होणार आहे.
  • जगातील सर्वांत उंच रेल्वेपूल असलेल्या चिनाब पुलाचे नव्या वर्षांत उद्घाटन होणार आहे.
  • मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो-३ प्रकल्प, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड कार्यान्वित होणार आहे.
  • वाहन उद्योगात इलेक्ट्रिक श्रेणीतील अनेक नवी वाहने बाजारात येणार आहे.
क्रीडा

क्रीडा क्षेत्रातही ऑलिम्पिक स्पर्धेसह, टी-२० वर्ल्डकप, युरो कप स्पर्धांचे आयोजन केले आहे. (New Year 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.