American Premier League : अमेरिकन प्रिमिअर क्रिकेट लीगमध्ये पंचांनाच आयोजकांनी काढलं मैदानाबाहेर

पैशाच्या व्यवहारांवरून झालेल्या भांडणामुळे ऐन क्रिकेट सामन्याच्या मध्यावर पंचांनाच आयोजकांनी मैदानाबाहेर काढल्याची वादग्रस्त घटना अमेरिकेत घडली आहे. पंचांच्या दाव्यानुसार, आयोजकांनी त्यांना ३०,००० अमेरिकन डॉलरची देय रक्कम वेळेवर दिली नाही.

161
American Premier League : अमेरिकन प्रिमिअर क्रिकेट लीगमध्ये पंचांनाच आयोजकांनी काढलं मैदानाबाहेर
American Premier League : अमेरिकन प्रिमिअर क्रिकेट लीगमध्ये पंचांनाच आयोजकांनी काढलं मैदानाबाहेर
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटमधील एका विचित्र वादात पैशाच्या देवाण घेवाणीवरून अमेरिकन लीगमध्ये (American League) एक विचित्र प्रकार घडला आहे. (American Premier League)

पैशाच्या व्यवहारांवरून झालेल्या भांडणामुळे ऐन क्रिकेट सामन्याच्या मध्यावर पंचांनाच आयोजकांनी मैदानाबाहेर काढल्याची वादग्रस्त घटना अमेरिकेत घडली आहे. पंचांच्या दाव्यानुसार, आयोजकांनी त्यांना ३०,००० अमेरिकन डॉलरची देय रक्कम वेळेवर दिली नाही. तर आयोजकांच्या मते त्यांनी काही रक्कम आगाऊ दिलेली होती. तरीही पंचांनी उपांत्य फेरीचे दोन्ही सामने अडवून धरले आणि आधी ठरल्याप्रमाणे सामने संपण्याची वाट पाहिली नाही. (American Premier League)

आयोजकांनीच मीडियाकडे केलेल्या वर्णनानुसार, ‘पोलिसांना मैदानावर बोलावून पंचांना मैदानाबाहेर काढलं.’ (American Premier League)

‘पंचांना डाऊन पेमेंट करण्यात आलं होतं. तरीही त्यांनी उपांत्य फेरीचे दोन सामने अडवून धरले. असं ते करू शकत नाहीत. त्यामुळे डॅनी खान, विजया, ब्रायन, ओवेन्स अशा चौघांना आम्ही बाहेर काढलं. आणि मग सामने सुरू करण्यात आले,’ असं अमेरिकन प्रिमिअर लीगच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (American Premier League)

(हेही वाचा – BJP : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी मोडणार राजीव गांधींचा रेकॉर्ड)

तर अमेरिकेतील एक नावाजलेले क्रीडा पत्रकार पीटर डेला पिना यांनी एक पंच विजय प्रकाश मलेला यांची बाजू मांडणारं एक ट्विट केलं आहे. ‘मी विजय प्रकाश मलेला, आयसीसीची मान्यता असलेला क्रिकेट पंच आहे. एपीएलच्या संघांबरोबर घालवलेले १० दिवस चांगले गेले. पण, या दिवसांत आम्हाला कामाचा मोबदला मात्र मिळाला नाही. आम्ही पदरचे पैसे खर्च करून पंचगिरी करत होतो. जेव्हा आयोजकांकडून येणं असलेले हक्काचे ३०,००० डॉलर त्यांच्याकडे मागितले, तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावलं. आम्हाला तिथून निघून जावं लागलं. झाला प्रकार दुर्दैवी होता.’ असा संदेश लिहिलेला एक स्क्रीनशॉट पिना यांनी शेअर केला आहे. (American Premier League)

अमेरिकेत हळूहळू टी-२० लीग क्रिकेट मूळ धरु लागलं आहे. आणि यंदाचा टी-२० विश्वचषकही जून महिन्यात वेस्ट इंडिज सह अमेरिकेत होणार आहे. पण, आता क्रिकेटमध्ये झालेला हा प्रकार नक्कीच न भूतो न भविष्यती प्रकारातील आहे. (American Premier League)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.