Narendra Modi: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

रुबी ते रामवाडी या मेट्रोमार्गावरील बंडगार्डन, कल्याणीनगर व रामवाडी स्थानकांचे काम पूर्ण झाल्याने ती उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. येरवडा स्थानकाचे काम अद्याप सुरू असल्याने ते काही अवधीने सुरू होणार आहे.

139
Narendra Modi: येत्या ५ वर्षांत जम्मू-काश्मीरला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचेय; पंतप्रधान मोदींचा विश्वास
Narendra Modi: येत्या ५ वर्षांत जम्मू-काश्मीरला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचेय; पंतप्रधान मोदींचा विश्वास

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या ६ किलोमीटर अंतराच्या मेट्रोमार्गाचे येत्या बुधवारी (६ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड ते निगडी या ४.४ किलोमीटर विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे.

पंतप्रधान मोदी येत्या बुधवारी एका कार्यक्रमासाठी कोलकाता येथे येणार असून, त्या कार्यक्रमामध्येच ते पुण्यातील एका मेट्रोमार्गाचे उद्घाटन आणि पिंपरी-चिंचवडमधील एका मेट्रोमार्गाचे भूमिपूजन करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने मेट्रो प्रशासनाला कळवले आहे. दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल होण्याची शक्यता असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे.

(हेही वाचा  – AAP Delhi Office : आता ‘आप’ला आपले कार्यालय रिकामे करावे लागणार; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश)

रुबी ते रामवाडी या मेट्रोमार्गावरील बंडगार्डन, कल्याणीनगर व रामवाडी स्थानकांचे काम पूर्ण झाल्याने ती उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. येरवडा स्थानकाचे काम अद्याप सुरू असल्याने ते काही अवधीने सुरू होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.