Jitendra Awhad : समविचारी पक्षांसोबत राहा ; जितेंद्र आव्हाड यांची आंबेडकरांना विनंती

99
Jitendra Awhad : समविचारी पक्षांसोबत राहा ; जितेंद्र आव्हाड यांची आंबेडकरांना विनंती
Jitendra Awhad : समविचारी पक्षांसोबत राहा ; जितेंद्र आव्हाड यांची आंबेडकरांना विनंती
आपणांकडे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा  वारसा आहे. (Jitendra Awhad) तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे.  ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे. संविधान आणि लोकशाही हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे.  जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही.  त्यामुळे  आपण लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घ्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना केली आहे.

(हेही वाचा- Narendra Modi: रूबी ते रामवाडी मेट्रो मार्गाचे बुधवारी पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन)

वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Alliance) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) समावेश अजून अनिश्चित आहे. वंचितने महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडीला २६ जागांचा प्रस्ताव दिला असून या जागांवर चर्चेची तयारी दर्शवली आहे. तसेच लोकसभा  निवडणुकीत भाजप विरुद्ध वंचित असा सामना होईल. तसेच वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढली तर लोकसभेच्या सहा जागा सहज निवडून येतील, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे वंचितच्या आघाडीतील समावेशाविषयी संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोमवारी एक्स या समाज माध्यमातून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत राहण्याचे आवाहन केले आहे.

मी शिव, फुले, शाहू , आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हावा आणि  जनमाणसात  पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही  वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून आपणांकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा  वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी  ही  विनंती करीत असल्याचे आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया, असेही आव्हाड यांनी नमूद केले आहे.

हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.