BMC : रमाकांत बिरादार यांचे पुनर्वसन अखेर परिमंडळ सहाच्या उपायुक्तपदी

बिरादार हे येत्या दोन महिन्यांमध्ये सेवा निवृत्त होत आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये या परिमंडळ ६चे पद बिरादार यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होणार आहे.

199
Ashray Yojna : भायखळ्याच्या  टँक पाखाडी पुनर्विकासात ‘हाय रॉक’साठी बदलला बांधकामाचा आराखडा
Ashray Yojna : भायखळ्याच्या  टँक पाखाडी पुनर्विकासात ‘हाय रॉक’साठी बदलला बांधकामाचा आराखडा

महापालिकेचे उपायुक्त हर्षद काळे (Harshad Kale) हे सेवा निवृत्त झाल्याने आता त्यांच्या परिमंडळ पाच रिक्तपदी उपायुक्त देविदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर क्षीरसागर यांच्या जागी मागील काही दिवसांपासून पदाविना असलेले उपायुक्त रमाकांत बिरादार यांची नियुक्ती करत त्यांचे या जागी पुनर्वसन करण्यात आले आहे. (BMC)

(हेही वाचा- Swatantryaveer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रोपोगंडा नाही; चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताना काय म्हणाले रणदीप हुड्डा?)

मुंबई महापालिकेत (Municipal Corporation) (BMC) परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी असलेल्या रमाकांत बिरादर (Ramakant Biradar) यांच्याकडून या पदाचा भार काढून त्याऐवजी प्रशांत सपकाळे यांची वर्णी लावण्यात आली. मात्र, तेव्हापासून पदाविना असलेल्या रमाकांत बिरादर (Ramakant Biradar) यांचे पुनर्वसन कुठे होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, परिमंडळ ५ चे हर्षद काळे (Harshad Kale) ०१ मार्च २०२४ रोजी सेवा निवृत्त झाले. त्यामुळे या रिक्त जागी बिरादार यांची वर्णी लागली जाणार होती. परंतु बिरादार यांचे पुनर्वसन करण्यासाठी परिमंडळ सहाचे देवीदास क्षीरसागर यांची बदली परिमंडळ५च्या उपायुक्तपदी करण्यात आली आणि क्षीरसागर यांच्या परिमंडळ  ६ च्या रिक्तपदी बिरादार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिरादार हे येत्या दोन महिन्यांमध्ये सेवा निवृत्त होत आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये या परिमंडळ ६चे पद बिरादार यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होणार आहे. (BMC)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.