Narendra Modi: प्रभू रामाचे राज्य संविधान निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान म्हणाले…

यावर्षी आपल्या राज्य घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयालाही ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना केला. 

103
Narendra Modi: प्रभू रामाचे राज्य संविधान निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत, 'मन की बात'मध्ये पंतप्रधान म्हणाले...
Narendra Modi: प्रभू रामाचे राज्य संविधान निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत, 'मन की बात'मध्ये पंतप्रधान म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ १०९व्या कार्यक्रमाचे प्रसारण रविवारी (२८ जानेवारी) झाले. २०२४ सालातला हा पहिला कार्यक्रम आहे. सध्या अमृतकाळ सुरू असून एक नवीन उत्साह आहे. दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावर्षी आपल्या राज्य घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयालाही ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करताना केला.

या कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, भगवान श्रीरामाचे राज्य आपल्या राज्य घटनेच्या निर्मितीसाठी प्रेरणास्रोत राहिले आहे. २२ जानेवारीला देशबांधवांनी रामज्योती पेटवून दिवाळी साजरी केली. यावेळी लोकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. एकजुटीची ही भावना थांबता कामा नये, ही भावना देशाला नव्या शिखरावर घेऊन जाईल.

(हेही वाचा – IND vs PAK: ६० वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारकडून परवानगी)

राज्य घटनेच्या निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत…

असे सांगून अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी सांगितले की, राज्य घटनेच्या तिसऱ्या अध्यायात भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे वर्णन केले आहे. प्रभु श्रीरामांचे राज्य हे आपल्या राज्य घटनेच्या निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत आहे.

‘नारी शक्ती’चे कौतुक…
या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधानांनी २६ जानेवारीला महिलांनी केलेल्या परेडचेही कौतुक केले आहे. ते म्हणाले की, महिलांनी केलेली परेड अतिशय अद्भूत होती. यावेळी महिला सक्षमीकरण पाहणे हे सर्वात जास्त चर्चेचे होते. जेव्हा कर्तव्याच्या मार्गावर केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांची महिला पथके जाऊ लागली, तेव्हा प्रत्येकजण अभिमानाने भरून गेला. मोर्चा काढणाऱ्या 20 तुकड्यांपैकी 11 महिला होत्या. आम्ही पाहिले की, बाहेर आलेल्या चित्ररथामध्येही सर्व महिला कलाकार होत्या. या सांस्कृतिक कार्यक्रमात हजारो मुलांनी सहभाग घेतला. डीआरडीओने आणलेल्या चित्ररथानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाणी, जमीन, आकाश, सायबर आणि अंतराळ अशा प्रत्येक क्षेत्रांत ‘नारी शक्ती’ कशा प्रकारे देशाचे रक्षण करत आहे हे यातून दिसून येते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.