Indian Navy : ब्रिटीश जहाजाला भारतीय नौदलाची मदत; तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश

153
Indian Navy : ब्रिटीश जहाजाला भारतीय नौदलाची मदत; तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश
Indian Navy : ब्रिटीश जहाजाला भारतीय नौदलाची मदत; तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश

ब्रिटीश ऑइल टँकर मार्लिन (Marlin) या जहाजामधील तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी भारतीय नौदलाने (Indian Navy) मदत केली. सांगितले. INS विशाखापट्टणम (INS Visakhapatnam) मधील अग्निशमन दल, भारतीय नौदलाच्या 10 कर्मचाऱ्यांसह विशेष अग्निशमन उपकरणांसह ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय नौदलाच्या सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली. या जहाजावर 22 भारतीय देखील होते.

(हेही वाचा – IND vs PAK: ६० वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारकडून परवानगी)

हुथी बंडखोरांचा हात असल्याचा संशय

आग लागण्याचे कारण अद्याप जाहीर झाले नसले, तरी येमेनच्या इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी (Houthi rebels) या जहाजाला लक्ष्य केल्याचे समोर येत आहे. तसेच या जहाजावर 22 भारतीय आणि 1 बांगलादेशी कर्मचारी होता. ट्रेफिगुरा ट्रेडिंग फर्मच्या इंधन टँकरवर क्षेपणास्र हल्ला झाला. त्यामुळे या टँकरला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय नौदलाने म्हटले की, या घटनेमध्ये सध्या तरी कोणी जीवितहानी झाली नाही. तसेच या जहाजाच्या जवळपास मदतीसाठी देखील जहाजे आहेत. व्यावसायिक जहाजावर कोणताही हल्ला करणे अमान्य आहे, असे युके सरकारने या हल्ल्याविषयी म्हटले आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन सभागृहाची प्रतिमा ठरवते)

एक ब्रिटिश तेल टँकर तसेच अमेरिकन युद्धनौका, यूएसएस कार्नी यावर देखील या गटाने हल्ला केला.

पाश्चात्य सैन्य आणि मध्य पूर्व यांच्यातील समुद्रात काही दशकांतील संघर्ष चालू आहे. त्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 24 डिसेंबर 2023 रोजी समुद्रात येमेनच्या (Yemen) हुथी बंडखोरांनी उडवलेल्या ड्रोनने 25 भारतियांना घेऊन जाणाऱ्या तेलाच्या टँकरला धडक दिली होती. (Indian Navy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.