IND vs PAK: ६० वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारकडून परवानगी

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्या डेव्हिस चषक स्पर्धेतील गट-1 सामना 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद येथे खेळवला जाणार आहे.

211
IND vs PAK: ६० वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारकडून परवानगी
IND vs PAK: ६० वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारकडून परवानगी

मुंबईवर दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील (IND vs PAK) संबंध ताणले गेले. याचा परिणाम मैदानातील खेळावरही झाला. त्यामुळे क्रिकेटचे अनेक सामने पाकिस्तान वगळता वेगवेगळ्या देशांमध्ये होत असतात. मात्र आता ६० वर्षांनी भारतीय टेनिस संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार परवानगी दिली असून आगामी डेव्हिस चषकाच्या सामन्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार आहे. (Davis Cup IND vs PAK)

पाकिस्तान उच्चायुक्तालयाने भारतीय डेव्हिटीज कप संघातील आणि सपोर्ट्स स्टाफसाठी व्हिसाही जारी केला आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्या डेव्हिस चषक स्पर्धेतील गट-१ सामना ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद येथे खेळवला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पाकिस्तानसोबतचा होणारा डेव्हिस कपचा सामना इतरत्र हलवण्याची भारताची मागणी फेटाळली होती. त्यानंतर अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) भारताच्या संघाला पाकिस्तानमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सरकारकडे केली होती. हा सामना खेळण्यासाठी भारताचा संघ गेला नसता तर आयटीएफ पाकिस्तान वॉकओव्हर देऊ शकला असता, मात्र आता सरकारने परवानगी दिल्याने दोन्ही संघात सामना होईल आणि विजयी संघ स्पर्धेत पुढे जाईल.

(हेही वाचा – PM Narendra Modi : लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन सभागृहाची प्रतिमा ठरवते)

तब्बल 60 वर्षांनी पाकिस्तान दौरा
दरम्यान, भारतीय संघ १९६४ मध्ये डेव्हिस कप खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा ४-00 असा पराभव केला होता. त्यानंतर, २०१९ मध्ये कझाकिस्तानमध्ये दोन्हा संघातील सामना ठेवण्यात आला होता. त्यावेळी, एआयटीएने राजकीय तणावाचे कारण देत आयटीएफला सामना इतरत्र हालवण्याची विनंती केली होती, मात्र एआयटीएची ही मागणी मान्यही झाली होती. आता ही मागणी अमान्य झाल्याने भारताला पाकिस्तान दौऱ्यावर जावेच लागेल आणि त्यासाठी सरकारनेही परवानगी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.