Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही; सगळ्या समाजाला न्याय मिळणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक्सवर (ट्विट) प्रतिक्रिया दिली. 'मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. अतिशय सकारात्मक पद्धतीने त्यांनी हे आंदोलन केले. चांगला मार्ग यातून निघाला,' असे बावनकुळे म्हणाले आहेत.

146
Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही; सगळ्या समाजाला न्याय मिळणार

शनिवार २७ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला. याच पार्श्वभूमीवर (Chandrashekhar Bawankule) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – Davis Cup 2024 : भारतीय संघाचा तब्बल ६० वर्षांनी पाकिस्तान दौरा)

ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही व घेतलेलाही नाही. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार सकारात्मकच होते, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.

(हेही वाचा – Indian Navy : ब्रिटीश जहाजाला भारतीय नौदलाची मदत; तेल टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश)

आंदोलनातून चांगला मार्ग निघाला –

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक्सवर (ट्विट) प्रतिक्रिया दिली. ‘मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. अतिशय सकारात्मक पद्धतीने त्यांनी हे आंदोलन केले. चांगला मार्ग यातून निघाला,’ असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे –

ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून सरकारने मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. कायद्याचा आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, हे आमचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सांगत आहेत; तीच भूमिका कायम आहे, असेही (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.