Raj Thackeray: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी, अशी विनंती सरकार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. 

141
Raj Thackeray: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा - राज ठाकरे
Raj Thackeray: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा - राज ठाकरे

मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची या संमेलनाला उपस्थिती लाभेल, यावेळी समोरच्या व्यक्तिशी मराठीतच बोला, असं आवाहन महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी केलं.

राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी, अशी विनंती सरकार आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही; सगळ्या समाजाला न्याय मिळणार )

कार्यक्रमात ते म्हणाले की, मराठी, तामिळ, तेलगु भाषांप्रमाणे हिंदी भाषा उत्तम आहे, पण ती आपली राष्ट्रभाषा नाही. पंतप्रधानांना जर आपल्या गुजरातविषयी प्रेम असेल, तर आपण मराठी लोकं का मागे आहोत, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये 10वी पर्यंत मराठी भाषेची सक्ती करावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे तसेच फक्त मराठीवर उपकार करावे, बाकी सर्व आम्ही पाहू, असंही राज ठाकरे यांवेळी बोलताना म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशी अवस्था आपल्या राज्यात असतानाही राज्यात अमेरिकेत मात्र शंभरपेक्षा अधिक मराठी शाळा उघडल्या जात आहेत. ही अत्यंत मोलाची बाब आहे. अमेरिकेमध्ये बृह महाराष्ट्र मंडळाने हे करून दाखवले आहे. मराठी माणसाला मराठी बोलण्याची लाज वाटते. इतर राज्यातले लोक त्यांच्या भाषेशिवाय अन्य भाषेला कधीही महत्त्व देत नाहीत. मग आपण उगाच हिंदी का बोलावं. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये हिंदी ऐकायला येतं तेव्हा वाईट वाटतं.

मराठी संपवण्यासाठी राजकीय प्रयत्न
मराठी संपवण्याचा राजकीय प्रयत्न सुरू आहे. मराठीत जो विनोद होतो तो कुठल्याही भाषेत होऊ शकत नाही. मराठी बोलण्याला संकुचित वाटू देऊ नका. मराठी बोलण्याने तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. त्यामुळे कोणीही भेटलं की, त्याच्याशी मराठीतच बोला, असेही त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.