Mumbai Traffic Police : तुमचे गाडीवरील दंड थकित आहेत का, ‘इतक्या’ दिवसांत दंड भरला नाही, तर कोर्टात उभे रहावे लागेल…

32
Mumbai Traffic Police : तुमचे गाडीवरील दंड थकित आहेत का, 'इतक्या' दिवसांत दंड भरला नाही, तर कोर्टात उभे रहावे लागेल...
Mumbai Traffic Police : तुमचे गाडीवरील दंड थकित आहेत का, 'इतक्या' दिवसांत दंड भरला नाही, तर कोर्टात उभे रहावे लागेल...

मुंबई शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 34.61 लाख चालकांविरोधात कारवाई करत 247.82 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. (Mumbai Traffic Police) त्यापैकी 76 कोटी रुपये दंड वाहन चालकांनी भरलेले आहेत. तर उर्वरित 171 कोटी रुपायंचा दंड भरण्यासाठी वाहन चालकांना गणपतीपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीपर्यंत दंड भरण्यात आला नाही तर पुढे पोलीस प्रत्येक वाहनधारकाला नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात जाईल.

(हेही वाचा – Asia Cup 2023 India vs Sri lanka : श्रीलंकेच्या २० वर्षांच्या तरुणाने भारतीय क्रिकेट संघातील रथी महारथींना पाठवले माघारी)

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ई-चलानद्वारे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करूनही दंड भरण्यास टाळाटाळ केली जाते. परिणामी दंडाच्या थकबाकीचा आकडा वाढला आहे. 20 हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक प्रलंबित असलेला दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलीस आता थकबाकीदार वाहनमालकांच्या घरी नोटीस पाठवणार आहेत. ही नोटीस वाहन चालकांना गणपतीनंतर देण्यात येणार आहे. त्यानंतर जो कोणी 15 दिवसात दंड भरणार नाही, त्याच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू केला जाणार आहे. (Mumbai Traffic Police)

यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस जागेवरच रोख रक्कम स्वीकारून दंड आकारत होते. मात्र ते करताना पोलिसांकडून तडजोड व्हायची. असे प्रकार रोखण्यासाठी 2016 पासून ई-चलन प्रणाली लागून करण्यात आली होती. हा दंड संबंधित वाहनावर जमा होतो. वाहतूक पोलिसांच्या महाट्रॅफिक या ॲपवर जाऊन तो 14 दिवसांच्या आत ऑनलाईन भरायचा असतो. मात्र वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करत करत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसानी हे पाऊल उचलले आहे. (Mumbai Traffic Police)

कोट्यवधी रुपये थकबाकी

केवळ मुंबईच नाही, तर इतर उपनगरांमध्येही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भरावे लागणारे कोटींचे आकडे आहेत. ठाणे (46 कोटी 49 लाख 43 हजार 50 रुपये), वसई विरार ( 1 कोटी 41 लाख 4 हजार 950), मीरा भाईंदर (1 कोटी 18 लाख 73 हजार 400) आणि पालघर (33 लाख 35 हजार 400) इतकी प्रचंड थकबाकी आहे.

वाहनचालकांना 14 दिवसांची मुदत असते; परंतु तरी मुदतीत दंड भरत नाहीत. यासाठी दर तीन महिन्यांनी लोकअदालतीचे आयोजन केले जाते. यात दंड असलेल्या वाहनचालकांना बोलावून तडजोड करून दंडाची रक्कम भरण्यास सांगितले जाते. त्यातही कुणी दंड भरला नाही, तर त्यांच्यावर खटले दाखल करता येतात. वाहतूक पोलीस दंड वसुलीसाठी आरटीओ परिवहन आयुक्तांशीही समन्वय साधत आहेत. गणेशोत्सवानंतर वाहतूक पोलीस रस्त्यावरसुद्धा दंड वसुलीचे काम करणार आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर रक्कम भरावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असे आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे. (Mumbai Traffic Police)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.